Carrot Benefits esakal
आरोग्य

Carrot Benefits : हिवाळ्यात गाजराचा ज्यूस आरोग्यासाठी आहे लाभदायी, जाणून घ्या 'हे' फायदे

गाजरामध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते.

Monika Lonkar –Kumbhar

Carrot Benefits : हिवाळ्यात गाजर आवर्जून खाल्ले जाते. गाजरामध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. व्हिटॅमिन A ने समृद्ध असलेल्या गाजरामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. गाजराचा ज्यूस हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

पोषकतत्वांनी समृद्ध असलेला गाजराचा रस पिऊन अनेक जण त्यांच्या दिवसाची सुरूवात करतात. शिवाय, गाजरामध्ये कमी कॅलरीज देखील आढळून येतात, त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी गाजराचा ज्यूस पिणे हे फायदेशीर आहे. हा ज्यूस पिल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते.

गाजर हे आपल्या आरोग्याव्यतिरिक्त केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. हे अनेकांना माहित नसेल. आज आपण गाजराचा ज्यूस पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

गाजराचा ज्यूस पिल्याने आरोग्याला होणारे फायदे खालीलप्रमाणे :

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

गाजरामध्ये कमी कॅलरीजचे प्रमाण आढळून येते. शिवाय, गाजरामध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर आढळून येते. त्यामुळे, गाजराचा ज्यूस पिल्यावर लवकर भूक ही लागत नाही.

तसेच, शरीरातील फॅट्स बर्न करण्याचे काम गाजर करते. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी गाजराचा ज्यूस हा फायदेशीर ठरतो. गाजर हे एक डिटॉक्सीफाईंग एजंटच्या रूपात आपल्या शरीरात काम करते.

रोगप्रतिकारक शक्ती होते मजबूत

गाजरामध्ये व्हिटॅमिन्स आणि फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, गाजराचा ज्यूस पिल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

गाजरामध्ये व्हिटॅमिन सी, आणि ए चे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, संक्रमित आजारांशी लढण्यासाठी गाजर मदत करते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

डोळ्यांसाठी फायदेशीर आहे गाजर

गाजरामध्ये व्हिटॅमिन A आणि बीटा कॅरोटिनचे मुबलक प्रमाण आढळून येते. त्यामुळे, गाजराचा ज्यूस पिल्याने आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. शिवाय, डोळ्यांशी निगडीत इतर समस्या दूर होण्यास देखील मदत होते.

त्यामुळे, ज्यांना डोळ्यांच्या समस्या आहेत, अशा लोकांनी गाजराचे सेवन अवश्य करावे आणि गाजराचा ज्यूस देखील प्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT