Benefits Of Anjeer esakal
आरोग्य

Benefits Of Anjeer : हिवाळ्यात हेल्दी रहायचे असेल तर भिजवलेल्या अंजीराचे करा सेवन, जाणून घ्या ‘हे’ फायदे

अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक गुणधर्म आढळून येतात.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits Of Anjeer : अंजीर हे फळ खायला सर्वांनाच आवडते. स्वादिष्ट असण्यासोबतच अंजीर हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. गोड आणि रसाळ फळ म्हणून अंजिराची खास ओळख आहे.

विशेष म्हणजे हे एक प्रकारचे असे फळ आहे की, जे तुम्ही ताजे ही खाऊ शकता आणि वाळवून ही खाऊ शकता. या फळापासून खास आईसक्रीम देखील बनवली जाते. ती खाण्यासाठी लोकांची नेहमी पसंती असते.

अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक गुणधर्म आढळून येतात. ज्यामध्ये, व्हिटॅमीन ए, सी, ई, के, बी6, पोटॅशिअम, मॅंगनीज आणि मॅग्नेशिअम सारखे आवश्यक पोषकतत्वे आढळून येतात. त्यामुळे, या फळाचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.

हिवाळ्यात जर तुम्ही अंजीर भिजवून खाल्ले तर त्याचे कित्येक फायदे आपल्याला होतात. कोणते आहेत हे फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.

हाडे बळकट राहतात

भिजवलेल्या अंजीरचे सेवन केल्याने हाडे मजबूत राहण्यास मदत होते. अंजीरमध्ये असलेले कॅल्शिअम आणि फॉप्फरस हे हाडांच्या विकासासाठी उपयुक्त असून यामुळे हाडे बळकट राहण्यास मदत होते. त्यामुळे, हिवाळ्यात, तुमच्या आहारात अंजीराचा जरूर समावेश करा.

पचनक्षमता सुरळीत राहते

ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत, अशा लोकांसाठी भिजवलेले अंजीर खाणे हे अतिशय फायदेशीर ठरू शकते. खास करून ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांच्यासाठी भिजवलेले अंजीर खाणे हा रामबाण उपाय ठरू शकतो.

अंजीरमध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर आढळून येते. त्यामुळे, आतड्यांची हालचाल होण्यास मदत होते. ज्यामुळे, बद्धकोष्ठतेची समस्या, पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते आणि पचनक्षमता सुरळीत राहते.

त्वचेसाठी लाभदायी

अंजीरमध्ये व्हिटॅमिन्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. या व्हिटॅमिन्समध्ये व्हिटॅमीन सी, ई आणि व्हिटॅमीन ए चे भरपूर प्रमाण आढळून येते, जे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे.

अंजीराचे सेवन केल्याने आपल्या त्वचेचे उत्तम पोषण होते आणि त्वचा ग्लोईंग राहते. त्यामुळे, हिवाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही आहारात अंजीराचा समावेश करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Chenab Bridge : आयफेल टॉवरप्रमाणे चिनाब पुलाचेही घेता येणार विहंगम दर्शन!

Navratri Diet Tips for Fast: नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खाताय? पचन चांगलं ठेवण्यासाठी आहारात वाढवा 'हे' पोषणतत्त्व

SCROLL FOR NEXT