Benefits of Pistachios  esakal
आरोग्य

Benefits of Pistachios : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी लाभदायी आहे पिस्ता, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

पिस्त्यामध्ये अनेक पौष्टिक घटकांचा समावेश आढळून येतो.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of Pistachios : ड्रायफ्रूट्समध्ये आरोग्यदायी मानला जाणारा पिस्ता हा सर्वांच्या आवडीचा आहे. बदाम, काजूसोबत याचे सेवन करायला देखील अनेकांना आवडते. चवीला गोड आणि किंचित खारट असणारा पिस्ता एकदा खायला सुरूवात केली की, आपण खातच राहतो. इतके ते चविष्ट आणि हेल्दी असतात.

पिस्त्याचा वापर अनेक प्रकारच्या गोड पदार्थांमध्ये, मिठाई, शेवया, खीर इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. पिस्त्यामध्ये अनेक पौष्टिक घटकांचा समावेश आढळून येतो. हे पौष्टिक घटक अनेक आजारांपासून आपल्याला दूर ठेवण्याचे काम करतात.

पिस्त्यामध्ये लोह, फायबर्स, फॉस्फरस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम इत्यादी अनेक प्रकारचे पोषकतत्वे आढळून येतात. आज आपण पिस्त्याचे आरोग्यदायी फायदे कोणते? ते जाणून घेणार आहोत.

डोळ्यांसाठी फायदेशीर

पिस्त्याचे सेवन करणे हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. पिस्त्यामध्ये आढळून येणाऱ्या अँटिऑक्सिडेंट ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे घटक आढळून येतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे,पिस्त्याचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली राहण्यास मदत होते.

हाडांना मिळते मजबूती

पिस्ता खाल्ल्याने हाडांना मजबूती मिळते. तसेच, हाडांच्या वाढीला प्रोत्साहन देण्याचे काम पिस्ता करते. त्यामुळे, पिस्त्याचे रोज प्रमाणात सेवन करणे फायद्याचे ठरते.

पिस्ता हा प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर्सचा प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे, पिस्त्याचे सेवन केल्याने हाडांना मजबूती मिळते.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते

पिस्ता हा मूळात चवीला खारट आणि किंचित गोड असतो. त्यामुळे, मधुमेह असणाऱ्या व्यक्ती देखील पिस्त्याचा आहारात समावेश करू शकतात. पिस्त्याचे नियमित सेवन केल्याने मधुमेहाचा धोका देखील बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

पिस्त्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय, पिस्त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे, मधुमेह असणाऱ्या व्यक्ती देखील पिस्त्याचे आवर्जून सेवन करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT