Fenugreek Seeds Benefits esakal
आरोग्य

Fenugreek Seeds Benefits : लोहाची कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत मेथीचे दाणे, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

मेथीच्या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, फायबर्स, व्हिटॅमिन सी, लोह आणि इतर पौष्टिक घटकांचा समावेश असतो. जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Fenugreek Seeds Benefits : हिवाळ्यात अनेक हिरव्या पालेभाज्या मार्केटमध्ये येतात. या हिरव्या पालेभाज्यांमध्ये मेथीचा ही समावेश आहे. मेथीमध्ये व्हिटॅमिन सी आणि विविध प्रकारच्या पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. मेथीचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते.

परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की, मेथीचे दाणे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. मेथीच्या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, फायबर्स, व्हिटॅमिन सी, लोह आणि इतर पौष्टिक घटकांचा समावेश असतो. जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. आज आपण मेथीच्या दाण्यांचे आरोग्याला होणारे फायदे कोणते? त्याबद्दल जाणून घेऊयात.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते

मेथीच्या दाण्यांचा आहारात समावेश करणे, हे मधुमेहाच्या रूग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये शरीरात विरघळणाऱ्या फायबर्सचा समावेश असतो. जे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

लोहाची कमतरता दूर होते

मेथीच्या दाण्यांमध्ये लोहाचे भरपूर प्रमाण आढळून येते. मेथीच्या दाण्यांचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. यासोबतच मेथीच्या दाण्यांमध्ये लोहाचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.

लोहामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. खास करून गर्भधारणे दरम्यान आणि स्तनपाण करण्याच्या काळात लोहाची कमतरता असलेल्या महिलांसाठी मेथीचे दाणे उपयुक्त आहेत.

सांधेदुखीपासून आराम मिळेल

मेथीच्या दाण्यांमध्ये लोह, फायबर्स, फॉस्फरस आणि कॅल्शिअमचे भरपूर प्रमाण आढळून येते. या सर्व पोषकघटकांमुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते. यासोबतच मेथीच्या दाण्यांमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्मांचा समावेश असतो. हे गुणधर्म आपल्या शरीरातील सांध्यांमधील सूज कमी करण्यास मदत करतात.

काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी रोज रात्री एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर, सकाळी चावून खा. यामुळे, सांधेदुखीपासून तुम्हाला आराम मिळण्यास मदत होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Manager Work Pressure Death: खळबळजनक! बारामतीत 'Workload'मुळे बँक मॅनेजरने बँकेतच गळफास लावून दिला जीव

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे दोन तास एकाच हॉटेलमध्ये; भेट झाली नसल्याची सूत्रांची माहिती

BMC Election: निवडणुकीनंतर 14 गावे बाहेर काढणार; गौप्यस्फोट करत वनमंत्र्यांनी यादीच दिली

Karad News : विधीमंडळातील मारामारीप्रकरणी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा थेट सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

Rahul Gandhi: ''मोदीजी, 'त्या' पाच लढाऊ विमानांचं सत्य काय?'' राहुल गांधींकडून थेट निशाणा

SCROLL FOR NEXT