Benefits of Sunbathing esakal
आरोग्य

Benefits of Sunbathing : हाडांच्या बळकटीपासून ते वजन कमी करण्यापर्यंत, सकाळच्या उन्हामुळे मिळतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Benefits of Sunbathing : सूर्यप्रकाशामुळे आसपासचे वातावरण फ्रेश आणि जिवंत राहते. कोवळ्या उन्हात बसल्यामुळे आपल्या शरिराला व्हिटॅमिन डी मिळते.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of Sunbathing : निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे, हे अतिशय महत्वाचे आहे. या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल राखला की, आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत. या सगळ्यासोबतच आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या जीवनसत्वांचा योग्य पुरवठा होणे गरजेचे आहे.

सूर्याच्या किरणांमुळे आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळते, हे कदाचित सगळ्यांनाच माहित असेल. सूर्यप्रकाशामुळे आसपासचे वातावरण फ्रेश आणि जिवंत राहते. कोवळ्या उन्हात बसल्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते. परंतु, सूर्याच्या अतिनील किरणांचा आपल्या शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते.

साधारणपणे आपण असे ऐकले आहे की, सूर्यकिरणांमुळे आरोग्याला नुकसान होते. सूर्यकिरणांपासून व्हिटॅमिन डी आणि ऊर्जा देखील मिळते. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का की, कोवळ्या उन्हात बसल्यामुळे, आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. कोणते आहेत इतर फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.

व्हिटॅमिन डी

आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही सकाळच्या सूर्यप्रकाशाची मदत घेऊ शकता. सकाळच्या कोवळ्या उन्हात १०-१५ मिनिटे बसल्यामुळे आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. या व्हिटॅमीन डी मुळे आपल्या शरीरातील हाडे, दात, नखे, मेंदू आणि रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून बचाव ही होतो.

हाडांना मिळते बळकटी

सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमीन डी मिळते. या व्हिटॅमीन डी मुळे आपल्या हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते. शिवाय, हाडांना चांगली बळकटी मिळते. त्यामुळे, ज्या लोकांना सांधदुखीचा त्रास आहे, किंवा हाडे कमजोर झाली आहेत, अशा लोकांनी सकाळच्या कोवळ्या उन्हात १०-१५ मिनिटे बसायला काही हरकत नाही.

ताण-तणाव कमी होतो

व्हिटॅमीन डी चा शरीराला योग्य प्रमाणात पुरवठा झाल्यामुळे आपले मूड नियंत्रित राहतात. शिवाय, ताण-तणाव दूर होण्यास मदत होते. मूड फ्रेश राहतो आणि चिंता कमी होते. थोडक्यात सूर्यप्रकाशातील या व्हिटॅमीन डी मुळे शारिरीक आरोग्यासोबतच आपणे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे, ताण-तणावाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हात काही क्षण नक्कीच घालवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT