Health Care  esakal
आरोग्य

Health Care : पपई खाल्ल्यानंतर 'या' पदार्थांचे करू नका सेवन, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या पपईचे सेवन केल्यानंतर काही खाद्यपदार्थ खाणे टाळले पाहिजे.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : पपई हे एक असे फळ आहे की, ज्यामध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, पपई आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी चे भरपूर प्रमाण आढळून येते. व्हिटॅमीन सी हे आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी आणि पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी मानले जाते.

हे फळ कोणत्याही ऋतुमध्ये तुम्ही खाऊ शकता. मात्र, हे फळ खाल्ल्यानंतर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. पपई खाल्ल्यानंतर काही खाद्यपदार्थ खाणे टाळले पाहिजे. त्यामुळे, हे खाद्यपदार्थ कोणते आहेत? जे आपण पपईच्या सेवनानंतर खाणे टाळले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात.

टोमॅटो

पपई खाल्ल्यानंतर टोमॅटोचे सेवन करणे टाळले पाहिजे. पपई खाल्ल्यानंतर टोमॅटो कधीच खाऊ नये, यामुळे आरोग्याची मोठी हानी होते. पपईचे सेवन केल्यावर लगेच टोमॅटो खाल्ल्यानंतर पोटाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यामध्ये अ‍ॅसिडीटी आणि जळजळ होणे इत्यादी समस्यांचा ही समावेश आढळून येतो.

दूध किंवा दूधापासून बनलेले पदार्थ

पपईचे सेवन केल्यानंतर दूध किंवा दूधापासून बनलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे. पपई खाल्ल्यानंतर लगेचच दूध किंवा दूधापासून बनवले जाणारे पदार्थ जसे की, चीज, दही किंवा बटर खाल्ल्याने पोटाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, शरीरात अस्वस्थता देखील जाणवू शकते.

द्राक्षे

पपईचे सेवन केल्यानंतर द्राक्षे कधीच खाऊ नयेत. द्राक्षे आणि पपई खाल्ल्यामुळे, तुम्हाला गॅसेस आणि अ‍ॅसिडीटीची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे, पपईसोबत  द्राक्षे किंवा पपईचे सेवन केल्यानंतर लगेच द्राक्षे खाणे हे टाळायला हवे. अन्यथा आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

लिंबू

पपई खाल्ल्यानंतर लिंबूचे सेवन करू नये. लिंबामध्ये सायट्रिक अ‍ॅसिडचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, पपईसोबत किंवा पपई खाल्ल्यानंतर लगेच लिंबाचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी खराब होऊ शकते. त्यामुळे, अ‍ॅनिमियाचा धोका वाढण्याची शक्यता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT