these fruits useful for diabetics health nature sakal
आरोग्य

मधुमेहींसाठी उपयुक्त फळे

मधुमेह ही एक वैद्यकीय स्थिती असून त्यासाठी व्यक्तींना त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलण्याची आवश्यकता असते.

सकाळ वृत्तसेवा

- विकास सिंह

मधुमेह ही एक वैद्यकीय स्थिती असून त्यासाठी व्यक्तींना त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलण्याची आवश्यकता असते. त्यात काही फळांचाही समावेश होतो. फळे खाण्याची आवड असल्याने आणि तो संतुलित आहाराचा देखील एक भाग असल्याने, जिभेचे चोचले पुरवताना मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी फळांचे काय महत्त्व आहे हे बघूया.

फायबर ः फळांमधील फायबर साखरेचे शोषण कमी करते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर होते. फायबर समृद्ध फळे सुधारित इन्शुलिन संवेदनशीलतेशी जोडली गेली आहेत. ते रक्तप्रवाहात ग्लुकोजचे स्थिर करतात परिणामी तुमची ऊर्जा पातळी कायम राहते. फायबरयुक्त फळांचे नियमित सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. मधुमेहाशी संबंधित अधिक विकार होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

कार्बोहायड्रेट्स असलेले अन्न त्यांच्या ग्लायसेमिक इंडेक्स(GI)नुसार एकतर हळूहळू किंवा पटकन पचले जाते. कार्बोहायड्रेट्सचे जलद पचन झाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी काही कालावधीत वाढू शकते. मंद गतीने पचणारी कोणतीही फळे मधुमेह असलेल्या व्यक्तीने खाणे चांगले असते.

नैसर्गिक साखर (किमान प्रक्रिया केलेले पदार्थ) ः मधुमेहींसाठी साखर किंवा जास्त साखरेचे पदार्थ खाण्यास प्रतिबंध आहे. मधुमेहाच्या व्यवस्थापनासोबत या इच्छा पूर्ण करण्यासाठी फळे स्नॅक्स म्हणून उत्तम पर्याय असतात.

चेरी ः चेरीमध्ये चरबी कमी असते आणि व्हिटॅमिन ‘सी’चा चांगला स्रोत असतो. चेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात. चेरी इन्शुलिनचे उत्पादन वाढवण्यास मदत करू शकतात. चेरीच्या सेवनाने रक्ताभिसरण निरोगी राहते.

संत्रे ः हे लिंबूवर्गीय फळ असून अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध आहेत. ते मधुमेहासाठी फायदेशीर ठरू शकते. ते हळूहळू पचत असल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने हायड्रेशनला प्रोत्साहन देऊन आणि पचनमार्गातून साखरेचे शोषण कमी करते. परिणामी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करू शकते.

सफरचंद ः फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यासारख्या पोषक घटकांमुळे मधुमेहासाठी सफरचंद फायदेशीर ठरू शकतात. फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असण्याव्यतिरिक्त, सफरचंद चघळल्याने लाळेचे उत्पादन वाढते. ते तोंडाचे आरोग्य राखण्यास मदत करते.

किवी ः किवी हे एक लहान हिरवे किंवा तपकिरी तंतुमय फळ आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ असते. किवीमध्ये ॲक्टिनिडिनसारखे एन्झाइम असतात. ते पचनास मदत करतात. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये त्वचेशी संबंधित विविध समस्या असतात. त्यावर मात करण्यासाठी किवी हा सर्वोत्तम पर्याय बनतो.

या फळांव्यतिरिक्त द्राक्ष, प्लम आणि पीच देखील मधुमेहाच्या रुग्णांसाठी खाणे चांगले आहे. फळे खाण्याबरोबर नियमित चालणे महत्त्वाचे आहे. चालण्यामुळे शरीरातील साखर जाळण्यास मदत होते, आणि फळे खाण्याचे फायदे वाढतात. त्यामुळे रोज एक फळ खा, चालत राहा आणि तुम्हाला मधुमेह असला तरीही फलदायी जीवन जगा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT