Health Care  esakal
आरोग्य

Health Care : पायांना सूज येण्यामागे असू शकतात ‘या’ गंभीर समस्या

पायांना वारंवार सूज येत असेल तर वेळीच सावध व्हा.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : निरोगी जीवनशैलीसाठी योग्य आहार आणि व्यायाम याचे संतुलन राखता येणे महत्वाचे आहे. मात्र, आजकाल असे प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही. आरोग्याच्या तक्रारी या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यामागे अनेक कारणे असू शकतात.

आता, पायांना सूज येणे ही समस्या आपल्यातील अनेकांना जाणवली असेल. मात्र, याकडे आपण नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले असेल. जसे की, थकवा आल्यामुळे, चालल्यामुळे, जड काम केल्यामुळे पायाला सूज आली असेल असे म्हणून, याकडे कानाडोळा केला असेल.

परंतु, पायांना सूज येणे ही एक गंभीर समस्या ठरू शकते. जर तुमच्या पायांना वारंवार सूज येत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण, हे तुमच्या गंभीर आजाराचे एक प्रमुख लक्षण असू शकते. पायांना सूज ही अनेक गंभीर समस्यांमुळे येऊ शकते. त्यातील प्रमुख कारणे कोणती? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

किडनीच्या समस्या

किडनीच्या समस्या निर्माण झाल्या की, लघवी रक्तातून फिल्टर केली जात नाही, अशा परिस्थितीमध्ये मग लघवीची शरीरातील पातळी ही वाढत जाते. त्यामुळे, पायाला सूज येते.

या स्थितीमध्ये आपल्या शरीराचे मूत्रपिंड अर्थात किडनी लघवी फिल्टर करू शकत नाही. त्यामुळे, शरीरात पाणी जास्त साचते. यामुळे, मग, पायाला सूज येणे, पाठदुखी आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांकडे वेळीच लक्ष द्या चुकूनही दुर्लक्ष करू नका.

पोषकतत्वांची कमतरता

आपल्या शरीराला जर योग्य प्रमाणात पोषकतत्वे मिळाली नाही तर, पायाला सूज येऊ शकते. त्यामुळे, तुमच्या आहारात सकस आणि संतुलित आहार असणे फार महत्वाचे आहे. ते जर शरीराला नाही मिळाले तर, मग पायांना सूज येऊ शकते.

यासोबतच, जर तुमच्या आहारात मीठाचा जास्त प्रमाणात वापर होत असेल, तर हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. शरीरात जास्त मीठ जमा झाल्यास शरीराच्या अनेक भागांमध्ये पाणी साठून राहते. खास करून पायांमध्ये, त्यामुळे, पायांना लगेच सूज येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT