litchi  sakal
आरोग्य

Health Tips: 'या' लोकांनी चुकूनही लिची खाऊ नये, आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

लीची गर्मित येणारे एक प्रमुख फळ आहे. चवीत गोड आणि रसदार असल्याशिवाय हे आरोग्यासाठी देखील फारच फायदेशीर आहे.

Aishwarya Musale

आंबा हे उन्हाळ्यात सर्वात जास्त खाल्ले जाणारे हे फळ आहे. पण लिची हे एक असे फळ आहे जे त्याच्या चवीमुळे लोकांना प्रचंड आवडते. लिची केवळ प्रौढांचीच नाही तर लहान मुलांनाही आवडते. विशेष म्हणजे यात अँटिऑक्सिडेंट असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो आणि त्वचेलाही त्याचा फायदा होतो.

पण तुम्हाला माहीत आहे का की अनेक आरोग्यदायी फायदे असलेली लिची आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते. गाझियाबादच्या जॉइंट डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलच्या एका डॉक्टरांनी सांगितले की, कोणत्या लोकांनी याचे सेवन टाळावे.

त्वचेची अ‍ॅलर्जी : डॉक्टर म्हणाले की, लिची खाल्ल्याने आरोग्याला कोणतीही हानी होत नाही, परंतु काही बाबतीत ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. डॉक्टरांच्या मते, ज्या लोकांना कोणत्याही प्रकारची ऍलर्जी आहे त्यांनी लिची खाणे टाळावे. कारण यामुळे त्वचेवर पुरळ किंवा खाज येण्याची समस्या वाढू शकते.

litchi

उच्च रक्तदाब: दुसरीकडे, ज्यांना बीपीची समस्या आहे त्यांनी देखील लिची जास्त खाणे टाळावे.

शुगरच्या रुग्णांसाठी टिप्स : दुसरीकडे, मधुमेह किंवा शुगरच्या रुग्णांनीही लिची खाताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. या फळामध्ये नैसर्गिक साखर असते आणि जर ते जास्त प्रमाणात सेवन केले तर शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. याशिवाय लिची खाण्यापूर्वी तुमच्या शुगर लेव्हलचेही निरीक्षण केले पाहिजे.

litchi

पोटाशी संबंधित समस्या : पोटाशी संबंधित समस्या असल्यास लिचीचे सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पोटात अडचण असली तरी लिची खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात किंवा मळमळण्याचा त्रास होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

Latest Marathi News Live Update : स्वातंत्र्यदिनानिमित्त बीबी का मकबऱ्याला मनमोहक तिरंगी रोषणाई

Stray Dogs : भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर! ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र ‘डॉग शेल्टर’ उभारा

Shirur Market Committee Election : शिरूर बाजार समितीची निवडणूक तात्काळ घ्या; काँग्रेस पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT