Health Care esakal
आरोग्य

Health Care : कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ‘या’ डाळी, आजच करा आहारात समावेश

आजकाल कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. कॉलेस्ट्रॉल वाढणे हे आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण, यामुळे, तुम्हाला हृदयविकार संभावण्याचा धोका असू शकतो.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : सध्याचे धावपळीचे जीवन, बिघडलेली जीवनशैली, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी गोष्टींमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आजकाल कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. कॉलेस्ट्रॉल वाढणे हे आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण, यामुळे, तुम्हाला हृदयविकार संभावण्याचा धोका असू शकतो.

मग, ही वाढलेली कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी लोक विविध प्रकारचे डाइट प्लॅन्स फॉलो करतात. मात्र, आपल्या भारतीय आहाराचा अविभाज्य भाग असलेल्या डाळी यामध्ये तुम्हाला मदत करू शकतात.

तुमच्या नियमित आहारात जर तुम्ही प्रथिने आणि पोषकघटकांनी समृद्ध असलेल्या या डाळी समाविष्ट केल्या तर कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात कोणत्या डाळींचा समावेश करावा? चला तर मग जाणून घेऊयात.

मसूर डाळ

मसूर डाळीमध्ये प्रथिने, कॅल्शिअम आणि प्रतिजैविक गुणधर्मांचा समावेश मोठ्या प्रमाणात आढळून येतो. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मसूर डाळ मदत करते.

यासोबतच मसूर डाळीचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते. मसूर डाळीमध्ये आढळणारे एन्झाइम्स आपल्या शरीरातील खराब कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करून चांगले कॉलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे, तुमच्या आहारात मसूर डाळीचा जरूर समावेश करा.

हरभरा डाळ

अनेक खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या हरभरा डाळीमध्ये पोटॅशिअमचे मुबलक प्रमाण आढळून येते. या डाळीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. ज्यामुळे, हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

या शिवाय, हरभरा डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी आढळतो. त्यामुळे, मेटॅबॉलिझमला चालना मिळते आणि शरीरातील इन्सुलिनच्या वाढीला प्रतिबंध घातला जातो.

मूग डाळ

वनस्पती आधारित प्रथिनांचा समृद्ध स्त्रोत म्हणून मूग डाळीला ओळखले जाते. या डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, या डाळीचे सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. ज्यामुळे, हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका टळतो. मूग डाळीचा आहारात समावेश केल्याने आपल्या शरीराची पचनक्रिया ही सुधारते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Semi Final Scenario: भारताला आता फक्त विजय पुरेसे नाही; उपांत्य फेरीसाठीचे गणित पूर्णपणे बदलले

T20 WC, IND vs SA: W,0,W,1,1,W; हार्दिक, रिंकू , अर्शदीप... एकाच षटकात सेम टू सेम OUT! केशव महाराजने ६ चेंडूत फिरवली मॅच

T20 WC, IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने रोखला भारताचा विजयी रथ! अहमदाबादमध्ये मोठा उलटफेर, सुपर-८ मध्ये चुरस वाढली

Devendra Fadnavis: अजितदादांच्या अपघात झालेल्या विमानातून मीही...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठं वक्तव्य, काय म्हणाले?

Mumbai: मुंबईत प्रवेश करताना दिसणार भव्य स्वागतद्वार! सर्व एंट्री पॉइंट्सवर प्रवेशद्वार बांधणार; रितू तावडेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT