fruits and vegetables
fruits and vegetables Esakal
आरोग्य

fruits and vegetables: या 'सहा' फळभाज्या तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यात करीत तुमची मदत..

सकाळ डिजिटल टीम

तुम्हाला जर का कमी पाणी पिण्याची सवय असेल तर पाण्याच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरात डिहाइड्रेशन तयार होते. शरीरात डिहाइड्रेशन तयार झाल की मग आपोआप तुमचे तोंड कोरडे पडते, रडताना डोळ्यातून अश्रूच येत नाही, सतत डोके दुखत राहते आणि प्रचंड चिडचिड होते या सगळ्या समस्या फक्त डिहाइड्रेशनमुळे निर्माण होतात.या समस्येपासून सुटकारा मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही फळे आणि काही फळभाज्या यांचा समावेश करू शकता.

आपल्या आपलं शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा फक्त एकच पर्याय माहिती आहे.तो पर्याय म्हणजे पोटभर पाणी पिणे पण याशिवाय आणखी काही असे पर्याय आहेत जे तुमचं शरीर हायड्रेटेड ठेवण्यास तुम्हाला मदत करु शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही फळ भाज्या आणि पालेभाज्या सांगणार आहोत, या भाज्यां मध्ये इतके पाणी असते की ज्यामुळे तुम्हाला भरपूर असे पोषक तत्वे मिळू शकतात तसेच तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरताही पूर्ण होते. फळे आणि भाज्यांचा सर्वात मोठा फायदा असा असतो की, त्यामध्ये शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक जसे की फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम आणि प्रथिने पाण्याच्या प्रमाणात असतात.

तुम्ही या सहा फळभाज्या तुमच्या आहारात सॅलड किंवा भाजीच्या स्वरूपात आहारात समावेश करू शकता.

1) संत्री: आहार आणि फिटनेसच्या एका अहवालानुसार, संत्री या फळामध्ये 88% पर्यंत पाण्याचे प्रमाण असते आणि ते फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि रोगाशी लढणारे एंटीऑक्सीडेंट अशा आवश्यक पोषक तत्वांचे मुख्य स्रोत संत्री या फळात असतो.

2) आंबा: आंब्यामध्ये पाण्याचे प्रमाण 83% पर्यंत असते. पौष्टिक मूल्याचा विचार केल्यास, ते पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सीचे आंब्यामध्ये मुबलक प्रमाणात असते.

3) अननस: अननस या फळातील पाण्याचे प्रमाण 86% पर्यंत असते.तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि व्हिटॅमिन ए खूप मोठ्या प्रमाणात असते.

4) नाशपाती: नाशपाती या फळात पाण्याचे प्रमाण 88% पर्यंत आहे. तसेच या फळांत पौष्टिक तत्त्वे देखील मोठ्या प्रमाणात असते सोबतच पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते. नाशपाती हे व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, बीटा-कॅरोटीन आणि फॉस्फरसचा या सगळ्या गोष्टींचा चांगला स्रोत आहे.

5) दोडका: दोडका या फळभाजीमध्ये पाण्याचे प्रमाण 94% पर्यंत आहे. दोडक्यात व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते.

6) काकडी: काकडीत पाण्याचे प्रमाण 95% पर्यंत असते. काकडी विशेष करुन व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम कमी प्रमाणात देतात. काकडी हे व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ए देणारी चांगली फळभाजी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanchanjungha Express Accident: बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात! प्रवाशांनी भरलेली कांचनजंगा एक्स्प्रेस मालगाडीला धडकली, ४ जणांचा मृत्यू

Sambhaji Nagar : पालकमंत्रिपदासाठी भाजप आग्रही;वरिष्ठांच्या भेटीसाठी प्रमुख पदाधिकारी थेट गाठणार मुंबई

Latest Marathi Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक

MHT-CET Exam Result : ‘सीईटी’ निकाल पाहण्यास सर्व्हर डाउनचा फटका!

Praful Patel : विधानसभेत राष्ट्रवादीचा ८५ ते ९० जागांवर दावा; प्रफुल पटेल म्हणाले...

SCROLL FOR NEXT