Childrens Health sakal
आरोग्य

Childrens Health : थंडीत लहान मूले आजारी पडतात? मग ‘या’ गोष्टींची घ्या खास काळजी

हवामान बदलले की, मोठ्यांसोबत लहान मुले देखील आजारी पडतात.

Monika Lonkar –Kumbhar

Childrens Health : बदलत्या वातावरणाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. आता थंडीची नुकतीच सुरूवात झाली असल्यामुळे प्रौढ आणि लहान मुलांवर याचा परिणाम होताना दिसत आहे. हवामान बदलले की, मोठ्यांसोबत लहान मुलांना सुद्धा सर्दी-खोकला, ताप आणि अंगदुखी इत्यादी समस्या सुरू होतात.

पावसाळा आणि हिवाळा सुरू झाला की, लहान मुलांना विशेषत: सर्दी-खोकला, ताप आणि इतर संसर्गजन्य आजार होतात. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे, मुले लगेच या आजारांना बळी पडतात. त्यामुळे, या दिवसांमध्ये पालकांनी लहान मुलांची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

या दिवसांमध्ये मुले आजारी पडू नये यासाठी मुलांचा योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. थंडीच्या दिवसांमध्ये मुलांना विविध समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

पुरेशी झोप

चांगल्या आरोग्यासाठी नीट झोप घेणे अतिशय महत्वाचे आहे. लहान मुलांनी देखील पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. खास करून १२ वर्षांखालील मुलांनी किमान ९ तासांची झोप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे, मुलांचा मूड चांगला राहतो आणि त्यांना आवश्यक ऊर्जा देखील मिळते. त्यामुळे, पालकांनी लहान मुलांच्या झोपेकडे नीट लक्ष द्यायला हवे.

संतुलित आहाराची जोड

लहान मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी संतुलित आहार अतिशय महत्वाचा आहे. या संतुलित आहारामध्ये सर्व पोषकघटकांचा समतोल असणे गरजेचे आहे. प्रथिने, कर्बोदके, फायबर्स आणि जीवनसत्वे हे सर्व घटक त्यांच्या आहारामध्ये असायला हवेत.

त्यासोबतच हिरव्या भाज्या, दूध, अंडी आणि कडधान्ये इत्यादी पौष्टिक आहारामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. शिवाय, योग्य संतुलित आहार घेतल्यामुळे लहान मुले कमी आजारी पडतात आणि लवकर बरी देखील होतात. त्यामुळे, लहान मुलांच्या संतुलित आहाराची पालकांनी विशेष काळजी घ्यावी.

व्यायाम आहे महत्वाचा

चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे, हिवाळा असो किंवा पावसाळा आपण प्रत्येक ऋतुमध्ये व्यायाम केलाच पाहिजे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी नियमित व्यायाम करणे महत्वाचे आहे.

लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्यायाम करणे फायदेशीर ठरते. व्यायामामुळे शरीरात चांगले हार्मोन्स तयार होतात. ज्यामुळे, मूड सुधारतो.

लहान मुलांनी सकाळच्या वेळेत व्यायाम केल्याने शरीराला बळकटी मिळते आणि शरीर रोगांशी लढण्यासाठी तयार होते. त्यामुळे, लहान मुलांनी नियमितपणे व्यायाम करायला हवा आणि खेळायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT