Everday Habits that Causes High Blood Pressure sakal
आरोग्य

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Daily Habits that Cause High BP in Young Adults: दैनंदिन जीवनशैलीतील 'या' ३ सवयी उच्च रक्तदाब वाढवू शकतात. आजच बदल करणे आहे आवश्यक!

Anushka Tapshalkar

थोडक्यात:

  1. उच्च रक्तदाब आता फक्त वयोवृद्धांपुरता मर्यादित न राहता तरुणांमध्येही वेगाने वाढतो आहे.

  2. जास्त मीठ, सतत तणाव आणि अति स्क्रीन टाइम ही हाय बीपी वाढवणारी प्रमुख कारणं आहेत.

  3. योग, आहार नियंत्रण आणि वेळेवर तपासणी यामुळे हाय बीपी नियंत्रणात ठेवता येतो.

Best Lifestyle Changes to Control Hypertension: उच्च रक्तदाब (High Blood Pressure) ही सध्याच्या धावपळीच्या जीवनातील एक सामान्य समस्या बनली आहे, जी आता केवळ वयोवृद्धांनाच नव्हे तर तरुणांनाही ग्रासत आहे. डॉक्टारांच्या मते आपल्या दैनंदिन जीवनशैलीतील काही ठराविक सवयी उच्च रक्तदाबाच्या मुख्य ट्रिगर आहेत. हे घटक हळूहळू आपल्या हृदयावर परिणाम करतात आणि जर वेळेत यावर नियंत्रण ठेवले नाही, तर हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

उच्च रक्तदाब वाढवणारी तीन प्रमुख कारणे

जास्त मिठाचे सेवन

मीठ हे आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहे, परंतु त्याचे जास्त सेवन रक्तदाब वाढवू शकते. शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढल्याने पाणी साचते, ज्यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते आणि हृदयावर ताण येतो. विशेषतः प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, चिप्स, पापड आणि लोणची यांसारख्या गोष्टींमधील मीठ अत्यंत धोकादायक असते. जागतिक आरोग्य संघटना (WHO) दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ न खाण्याचा सल्ला देते.

अति स्क्रीन टाइम

दिवसभर लॅपटॉप, मोबाईल किंवा टीव्हीसमोर बसणे केवळ डोळ्यांसाठीच नाही, तर हृदयासाठीही धोकादायक आहे. संशोधनानुसार, जास्त स्क्रीन टाइमचा संबंध लठ्ठपणा, विस्कळीत झोप आणि वाढलेल्या रक्तदाबाशी आहे. बसून काम केल्याने शरीराची हालचाल कमी होते, ज्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. तसेच, स्क्रीनमधून निघणारा ब्लू रे मेलाटोनिन हार्मोनला दाबतो, ज्यामुळे झोप कमी येते आणि उच्च रक्तदाब वाढतो.

ताण (स्ट्रेस)

ताण हे उच्च रक्तदाबाला शांतपणे वाढवणारे एक महत्त्वाचे कारण आहे. जेव्हा आपण तणावात असतो, तेव्हा शरीर 'कॉर्टिसोल' नावाचे हार्मोन तयार करते, जे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब दोन्ही वाढवते. ऑफिसमधील कामाचा ताण, नात्यांमधील समस्या, आर्थिक चिंता यांसारख्या गोष्टींमुळे शरीर सतत 'हाय अलर्ट मोड'मध्ये राहते. दीर्घकाळ टिकणारा ताण रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकतो, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

उच्च रक्तदाबाची सुरुवातीची लक्षणे

उच्च रक्तदाब अनेकदा कोणत्याही लक्षणांशिवाय येतो, परंतु काही सुरुवातीच्या लक्षणांवर लक्ष दिल्यास तो लवकर ओळखता येतो.

- डोकेदुखी

- चक्कर येणे

- थकवा

- श्वास लागणे

- नाकातून रक्त येणे

जर तुमच्या कुटुंबात कोणाला हा आजार असेल तर अधिक सावध राहणे महत्त्वाचे आहे. आठवड्यातून एकदा रक्तदाब तपासा आणि लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

उच्च रक्तदाब केवळ औषधांनीच नाही तर पुढीलप्रमाणे जीवनशैलीत सुधारणा करूनही नियंत्रित केला जाऊ शकतो.

- नियमित व्यायाम करणे

- आहारात बदल करणे

- योग आणि मेडिटेशन करणे

- नैसर्गिक पदार्थ जसेकी ग्रीन टी, लसूण आणि मेथी रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात

- पुरेसे पाणी पिणे

डॉक्टरांना कधी भेटणे आवश्यक आहे?

जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी, चक्कर येणे किंवा थकवा जाणवत असेल आणि रक्तदाब सतत 140/90 mmHg पेक्षा जास्त राहत असेल, तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अनेकदा उच्च रक्तदाब शरीराच्या आतून अवयवांना नुकसान पोहोचवत असतो. अशा परिस्थितीत, चांगल्या हृदय रोग तज्ञाला भेटा आणि आवश्यक चाचण्या करून घ्या. वेळेवर योग्य उपचार केल्यास जीवघेण्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.

FAQs

  1. उच्च रक्तदाब म्हणजे काय? (What is considered high blood pressure?)
    जेव्हा रक्तदाब 140/90 mmHg पेक्षा जास्त असतो, तेव्हा तो हाय बीपी मानला जातो.

  2. तरुणांनाही उच्च रक्तदाब होऊ शकतो का? (Can young people also get high BP?)
    होय, सध्याच्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही हाय बीपीचे प्रमाण वाढत आहे.

  3. हाय बीपीची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात? (What are the early symptoms of high BP?)
    डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा, श्वास लागणे आणि नाकातून रक्त येणे ही लक्षणं असू शकतात.

  4. जास्त मीठ खाल्लं तर खरंच बीपी वाढतो का? (Is excess salt really harmful for BP?)
    होय, जास्त सोडियम शरीरात पाणी साठवतो आणि त्यामुळे रक्तदाब वाढतो.

  5. अति स्क्रीन टाइमचा रक्तदाबावर कसा परिणाम होतो? (How does screen time affect blood pressure?)
    स्क्रीन टाइममुळे हालचाल कमी होते, झोप बिघडते आणि हे सगळं बीपी वाढवण्यास कारणीभूत ठरतं.

  6. बीपीसाठी डॉक्टरांकडे कधी जावं? (When should I consult a doctor for BP?)
    जर बीपी सातत्याने 140/90 पेक्षा जास्त असेल आणि लक्षणं जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT