High Blood Pressure esakal
आरोग्य

High Blood Pressure : उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी रोज करा 'या' योगासनांचा सराव

उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी योगा फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga For High Blood Pressure : आजकाल उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब या समस्या खूप सामान्य झाल्या आहेत. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर अनेक जणांना या समस्या सुरू होतात. संतुलित आहार आणि व्यायाम यांची योग्य सांगड घातल्यास तुम्हाला या समस्यांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

उच्च रक्तदाब (high BP) आणि कमी रक्तदाब (Low BP) इत्यादी समस्या दूर करण्यासाठी योगा देखील फायदेशीर आहे. योगामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. फक्त योगासनांचा सराव हा नियमितपणे करायला हवा. आज आपण उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित ठेवणाऱ्या योगासनांबद्दल जाणून घेणा आहोत.

शवासन

शवासन केल्याने उच्च रक्तदाबाची समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच, आपले शरीर हे रिलॅक्स आणि शांत होते.

  • हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पाठीवर सरळ झोपा.

  • त्यानंतर, डोळे बंद करा आणि दोन्ही पाय पसरवा.

  • त्यानंतर, तुमचे दोन्ही हात शरीराच्या समांतर रेषेत पसरवा.

  • दोन्ही हातांचे तळवे समोर दिसतील अशा पद्धतीने हात पसरवा आणि रिलॅक्स रहा.

  • आता खोलवर श्वास घ्या, ३० सेकंदांनी श्वास पुन्हा सोडा. ही प्रक्रिया २-३ वेळा करा.

भ्रामरी प्राणायाम

भ्रामरी प्राणायाम केल्याने तुमचा उच्च रक्तदाब बऱ्याच अंशी नियंत्रणात येण्यास मदत होते. तसेच, हा प्राणायाम केल्याने स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉल कमी होते. त्यामुळे, शरीराला आराम मिळतो.

भ्रामरी प्राणायाम करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • भ्रामरी प्राणायाम करण्यासाठी पद्मासनात शांत बसा.

  • त्यानंतर, तुमचे दोन्ही हात दुमडून कानाजवळ आणा.

  • यानंतर, दोन्ही हातांच्या अंगठ्याने दोन्ही कान बंद करा.

  • आता, दोन्ही हातांची तर्जनी कपाळावर ठेवा आणि मधले बोट डोळ्यांवर ठेवा.

  • त्यानंतर, अनामिका नाकावर आणि करंगळी तोंडाच्या दोन्ही बाजूला ठेवा.

  • आता, तुम्हाला तुमचे तोंड बंद ठेवावे लागेल.

  • आता नाकातून दीर्घ श्वास घ्या.

  • ही प्रक्रिया ५-६ वेळा करा. नंतर सामान्य स्थितीमध्ये पुन्हा या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT