किडणीची काळजी
किडणीची काळजी Esakal
आरोग्य

Health Tips : ‘या’ आजारांमुळे Kidney होवू शकते निकामी, वेळीच घ्या काळजी

Kirti Wadkar

Kidney Diseases : किडनी हा शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव आहे. किडनी शरीरात फिल्ट्रेशनचं काम करतात. किडनी Kidney निकामी झाल्या तर शरीरातील घाण आणि शरीरातील टाऊकू पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास अडचण निर्माण होईल, परिणामी कालांतराने याचा शरीरातील सर्वच अवयवांवर हळूहळू वाईट परिणाम दिसू लागतात. Three Diseases with highest risk of kidney failure health tips in marathi

असे अनेक इतर आजार आहेत ज्यामुळे किडनीवर Kidney परिणाम होवू शकतो. आपण या आजारांकडे अनेकदा दूर्लक्ष करतो. मात्र कालांतराने या आजारांमुळे तुमची किडनी निकामी होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अशा आजारांमध्ये Illness अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. हे आजार कोणते ते पाहुयात. kidney failure disease 

मधुमेह- मधुमेहाचे दोन प्रकार असतात डायबिटिज टाइप-१ आणि टाइप-२ तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मधुमेह असला तरी दोन्हीमध्ये किडनीवर परिणाम होत असतो. मधुमेहाची समस्या अधिक असेल तर किडनी निकामी होण्याची शक्यता वाढते. Diabetes and kidney failure

जेव्हा शुगर हाय होते तेव्हा ती रक्तात मिसळते आणि किडनीच्या आतील लाखो फिल्टरिंग करणाऱ्या कोषिकांना नुकसान पोहचवते. हळूहळू यामुळे पेशींचं नुकसान होतं आणि किडनी निकामी होवू शकते. यासाठीच शुगर नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. 

हे देखिल वाचा-

उच्च रक्तदाब- उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या संकुचित आणि अरुंद होण्याची शक्यता असते. high bp and kidney failure ज्यामुळे मूत्रपिंड म्हणजेच किडनीसह संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होते. अशावेळी किडनीच्या रक्वाहिन्या खराब होवून किडनी निकामी होवू शकते. 

हेपेटाइटिस- Hepatitis and kidney failure- हेपेटाइटिसमुळे ग्लोमेरुलोनेफ्राइटिस (Glomerulonephritis) नावाचा किडनीचा आजार होण्याची शक्यता बळावते. आपल्या किडनीत अनेक छोटे फिल्टर असतात. यांना ग्लोमेरुली असं म्हंटलं जातं. ग्लोमेरुलोनेफ्राइटिस ही या ग्लोमेरुलीची म्हणजेच फिल्टरची एका प्रकारची सूज आहे त्यामुळे किडनी फेल होवू शकते.  त्यामुळेच हेपेटाइटिसचा आजार असल्यास वरचेवर किडनीची तपासणी करणं गरजेचं आहे. तसचं डॉक्टरांच्या सल्लायाने योग्य आहार घेणं गरजेचं आहे.

यूटीआई UTI- यूटीआई म्हणजेच युरिन इंफेक्शनकडे आपण अनेकदा दूर्लक्ष करतो. मात्र या इंफेक्शनचा परिणाम किडनीवर देखील होवू शकतो. जर तुम्हाला वरचेवर युरीन इंफेक्शन  होत असले तर हे इंफेक्शन किडनीपर्यंत पोहचण्याची शक्यता असते.

यामुळे किडनीतील पेशींचं नुकसान होवू शकतं. त्यामुळे युरीन इंफेक्शन होणार नाही यासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे UTI झाल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.

किडनीसंबंधीत आजारांची इतर कारणं

आरोग्य तज्ञांच्या मते इतर काही शारीरिर समस्यांमुळे किंवा परिस्थितीमध्ये किडनी संहधीत आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टींकडेदेखील लक्ष देणं गरजेचं आहे. 

  • पॉलिसिस्टिक किडनी डिजीज हा एक अनुवांशिक आजार आहे. ज्यात मूत्रपिंडाच अनेत सिस्ट विकसित होतात. सुरुवातीच्या काळात या सिस्टचा त्रास जाणवत नाही. मात्र कालांतराने यामुळे वेदना जाणवू शकतात.

  • मोठ्या प्रमाणात पेनकिलर औषधं घेतल्यासही किडनीसंबधीत समस्या निर्माण होवू शकतात.

  • मुलांमध्ये हेमोलिटिक युरेमिक सिंड्रोम किडनीच्या समस्या निर्माण करू शकतं. 

  • मेटल पॉयझनिंग किंवा लेड पॉयझनिंगमुळे किडनीवर विपरीत परिणाम होवू शकतो.

    हे देखिल वाचा-

या इतर काही कारणांमुळे देखील किडनी निकामी होवू शकते. किडनी निकामी किंवा किडनी संबधीत गंभीर समस्या निर्माण झाल्यास शरीरात काही लक्षणं दिसून येतात. ही लक्षण ओळखल्यास तुम्ही वेळीच दक्षता घेऊ शकता. ही लक्षण कोणती ते पाहुतात.

  1. लघवीचं प्रमाण कमी होणं, पायांवर सूज येणं हे किडनीसंबंधीत समस्यांचं लक्षण आहे.

  2. श्वसवनास अडचण, थकवा तसचं छातीत दुखणे.

  3. किडनी निकामी होण्याच्या काही पायऱ्या आहेत. यात सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये अनेकदा कोणतीच लक्षणं दिसून येत नाहीत. तीसऱ्या टप्प्यात काही लक्षण दिसू लागतात.

  4. तिसऱ्या टप्प्यात बऱ्याचदा हाता-पायांवर सूज येणं, पाठीत दुखणे, लघवीचा रंग बदलणे ही लक्षण दिसतात.

  5. चौथा टप्प्यात किडनी काम करत असते मात्र ही स्थिती गंभीर असते. यात अॅनिमिया, हाय ब्लड प्रेशर तसचं हाडांसंबधी आजारांची लागण होवू शकते.

  6. पाचव्या टप्प्यात किडनी पूर्णपणे निकामी होते. यावेळी अनेक लक्षण एकत्रित दिसू लागतात. यात श्वास घेण्यास त्रास होणं, उलटी, त्वचेवर जास्त प्रमाणात खाज येणं अशी अनेक लक्षण दिसू लागतात. 

किडनी शरीरातील महत्वाचा अवयव असल्याने वेळीच लक्षण दिसताच डॉक्टरांकडे जाऊन योग्य त्या तपासण्या करणं गरजेचं आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT