Throat Infection esakal
आरोग्य

Throat Infection : घसा खवखवण्याकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा ‘या’ आजारांना बळी पडाल

घसा खवखवण्याकडे दुर्लक्ष केले तर अनेक गंभीर आजारांना बळी पडण्याची शक्यता असते.

Monika Lonkar –Kumbhar

Throat Infection : वातावरणात बदल झाला की, त्याचा आपल्या आरोग्यावर लगेच परिणाम होतो. थंडीच्या दिवसांमध्ये तर सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्याच्या समस्या सुरू होतात. घसा खवखवण्यास सुरूवात झाली की, लगेच खोकला येतो.

मग, या समस्या दूर करण्यासाठी आपण दवाखाण्यात जाऊन उपचार घेतो आणि काही घरगुती उपाय देखील करतो. मात्र, अनेक जण या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. खास करून घसा खवखवण्याच्या समस्येकडे अनेक जण दुर्लक्ष करतात.

मात्र, घसा खवखवण्याकडे तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नका. कारण, या समस्येकडे जर तुम्ही दुर्लक्ष केले तर, अनेक गंभीर आजारांना बळी पडण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत या समस्या? ज्या घसा खवखवण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात.

गंभीर अ‍ॅलर्जी

अनेकदा बरेच जण घसा खवखवण्याकडे दुर्लक्ष करतात. मग, अशावेळी फार फार तर कोमट पाणी पिऊन ही समस्या बरी करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, समस्या काही हटत नाही.

मग, अशावेळी घसा खवखवण्याची समस्या दीर्घकाळ टिकून राहिल्यामुळे तिचे रूपांतर गंभीर अ‍ॅलर्जीमध्ये होण्याची शक्यता असते. अनेकदा ही अ‍ॅलर्जी धूळ, प्रदूषण आणि आहारातील निष्काळजीपणामुळे होते.

बॅक्टेरिअल इन्फेक्शन

बॅक्टेरिअल इन्फेक्शन हे हळूहळू संपूर्ण शरीरात पसरते. त्यामुळे, गंभीर समस्या निर्माण होते. घसा खवखवण्याची समस्या ही अनेकदा बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे झालेली असते.

त्यामुळे, या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे संधीवाताचा ताप, किडनी इन्फेक्शन आणि घशामध्ये पू असलेले फोड येण्याची ही गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे, वेळीच घसा खवखवण्याकडे लक्ष द्या.

कॅन्सर

गळ्यामध्ये घसा खवखवण्याकजे दुर्लक्ष केल्यामुळे, तुम्ही कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला बळी पडू शकता. हो, तुम्ही वाचले ते अगदी खरे आहे.

वास्तविक या कॅन्सरची सुरूवात ही larynx, pharynx किंवा टॉन्सिल्सपासून होते. त्यामुळे, याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी डॉक्टरांकडे जाऊन त्वरीत उपचार घेण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

बेकायदा इमारत होणार भुईसपाट! उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचा पवित्रा; नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Thane News: ठाणे जिल्हा रुग्णालयाचा उकिरडा! ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; रुग्ण आणि नातेवाइकांच्या आरोग्यावर संकट

SCROLL FOR NEXT