IND A vs Nepal Live: नेपाळविरुद्ध भारताची प्रथम फलंदाजी; अभिषेक वैभवची जोडी मैदानात, तिलक वर्माने संघात केले महत्त्वाचे बदल

India A vs Nepal Live Score: रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ मध्ये भारत अ आणि नेपाळ यांच्यात सामना सुरू आहे. नेपाळने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा सलामीला उतरले असून, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळाली आणि पुढील सामने कधी होणार, जाणून घ्या.
India A vs Nepal Live Score

India A vs Nepal Live Score

esakal

Updated on: 

India A vs Nepal Live Score: एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेत आज भारत अ आणि नेपाळ यांच्यात सामना खेळवला जात आहे. दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या नाणेफेकीत नेपाळने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. भारताकडून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात केली आहे.

Loading content, please wait...