Thyroid Problem esakal
आरोग्य

Thyroid Problem : रोजच्या सवयीत करा हे छोटे बदल आणि व्हा थायरॉइडच्या समस्येतून मुक्त !

जर आपल्या शरीरात आयोडीनचे प्रमाण कमी झाले किंवा व्हायरल इन्फेक्शनची शक्यता असेल तर आपल्या थायरॉईड ग्रंथीला सूज येऊ शकते.

सकाळ डिजिटल टीम

How To Control Thyroid Problem : बऱ्याचदा आपल्याला जाणवतं की, अचानक वजन वाढत आहे किंवा कमी होत आहे. मुलींच्या बाबतीत पाळी अनियमित होणं, पीसीओडी अशा अनेक समस्या थायरॉइड ग्रंथीच्या समस्यांनी होतात. यावर वैद्यकिय उपायांबरोबर रोजच्या सवयींमध्ये काही लहानसे बदल केले तर या समस्येतून मुक्त होऊ शकतात. जाणून घेऊया.

थायरॉईड होण्याची करणे :

जर आपल्या शरीरात आयोडीनचे प्रमाण कमी झाले किंवा व्हायरल इन्फेक्शनची शक्यता असेल तर आपल्या थायरॉईड ग्रंथीला सूज येऊ शकते. या व्यतिरिक्त कमी थायरॉईड हार्मोन्स देखील कारणीभूत ठरू शकतात. हार्मोन्समधील बदलांमुळे थायरॉईड ग्रंथीमध्ये काम करण्यात बदल दिसून येतो.

थायरॉईड विकाराने ग्रस्त असणाऱ्यांनी आहारामध्ये काय घ्यावे

- अधिक तंतुमय पदार्थांचा समावेश करा.

- चरबी आणि कर्बोदके खाणे कमी करा. ताजी फळे आणि हिरव्या भाज्या जास्तीत जास्त खा.

- आयोडिनयुक्त मीठ, मासे, कवच असलेले मासे, अंडी, दही आणि गाईच्या दुधाचा समावेश करावा. त्यामुळे आयोडिनची योग्य पातळी राखली जाईल.

- गॉइटरसारखी गंभीर समस्या उद्भवू नये म्हणून ज्यात थायरॉइड ग्रंथींचा आकार वाढतो. त्यामुळे सोयाबीन, सॉय उत्पादनं, ब्रोकोली, कॉलीफ्लॉवर, कोबी, ब्रुसेल्स स्प्राऊट्स, टíनप्स, पीच, शेंगदाणे, मुळा हे गॉइट्रोजेन्स असणारे पदार्थ खाणं टाळावं. हे पदार्थ शिजवल्याने त्यातले घटक निकामी होतात, कारण ते उष्णता संवेदनशील असतात. परंतु हे पदार्थ केव्हा तरी आणि शिजवलेल्या स्थितीत खाणंच योग्य.

- नाचणी, बाजरी, दाट हिरव्या रंगाच्या पालेभाज्या सूपच्या आणि रसाच्या स्वरूपात खाव्यात. टोमॅटो, गाजर, आंबे, पपई, अननस, संत्री ही पिवळी-नारंगी फळं खावीत. बदाम, अक्रोडसारखा सुकामेवा, अळशी, तीळासारख्या तेलबिया, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसं लो-फॅट दूध/गाईचं दूध, ताक, दही आदींच्या सेवनाने आपण निरोगी राहतो.

हायपरथायरॉईड साठी योगासने आणि प्राणायाम :

सेतूबंधासन, मार्जरासान, शिशु आसन,शवासन,मंदगतीने केलेले सूर्य नमस्कार ,उज्जयी, भ्रमरी (भ्रमराप्रमाणे श्वसन), नाडी शोधन आणि शीतली आणि शीतकारी

हायपोथायरॉईड साठी योगासने :

सर्वांगासन,अधोमुखासन,विपरीतकरणी,जानू शीर्षासन,मत्स्यासन,हलासन, मार्जरासान

वेगाने सूर्य नमस्कार

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT