Tomato Side Effect esakal
आरोग्य

Tomato Side Effect : टोमॅटोशिवाय जमणारच नाही अशी सवय असणाऱ्यांनो वेळीच सावध व्हा, नाहीतर...

टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते

सकाळ ऑनलाईन टीम

Tomato Side Effects : प्रत्येक भाजीला चटपटीत बनवण्यासाठी त्यात आवर्जून टाकलेला पदार्थ म्हणजे टमाटर. मात्र टमाटरचा अतिरेक आरोग्यासाठी किती धोकादायक असू शकतो याची कल्पनाही तुम्हाला नसेल. टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने काय तोटे होतात, ते जाणून घ्या.

काही फळे किंवा भाज्यांचा अतिरेक तुमचे आरोग्य बिघडवू शकते. आपल्या जेवणात कोशिंबीर असते. यातमध्ये टॉमेटो असतो. टॉमेटो प्रमाणात खाणे चांगले असते. मात्र, काही लोक प्रमाणाबाहेर टोमॅटो खातात. टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. कारण टोमॅटोमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि पोटॅशियमसारखे अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारकही असतात.

टोमॅटोचा अतिवापर तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. म्हणूनच टोमॅटोला आम्लयुक्त समजल्या जातं. याचे जास्त सेवन केल्याने अॅसिडीटीचा त्रास होतो. त्यामुळे टोमॅटो अति खाणे टाळा. (Health News)

होतील या समस्या

गॅसची समस्या -

अनेकाना पचनाचा त्रास असतो. त्यामुळे ज्या लोकांना गॅसची समस्या असते. त्या लोकांनी टोमॅटोचे जास्त सेवन करणे टाळले पाहिजे. कारण टोमॅटोमुळे पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे गॅसची समस्या टाळण्यासाठी टोमॅटो टाळला पाहिजे.

किडनी स्टोनची समस्या -

ज्यांना किडनीस्टोनचा त्रास आहे. त्यांनी बियासहीत टॉमेटो खाणे अधिक धोक्याचे आहे. किडनी स्टोनच्या रुग्णांनी चुकूनही टोमॅटोचे सेवन करु नये. कारण टोमॅटोच्या बियांमुळे खड्यांची समस्या वाढू शकते. दुसरीकडे, तुम्ही जरी टोमॅटोचे सेवन केले तरी आधी टोमॅटोचे बिया काढा मग त्याचे सेवन करा.

छातीत जळजळ -

अनेकांना जागरण केल्याने जळजळ होण्याची समस्या असते. ज्यांना जळजळ होण्याचा त्रास असतो, अशा लोकांनी टॉमेटो खाऊ नये. जर तुम्ही टोमॅटोचे जास्त सेवन केले तर तुम्हाला छातीत जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. कारण टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते. ज्यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे जर तुम्ही टोमॅटोचे जास्त सेवन करत असाल तर काळजी घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी अपडेट! कर्जमाफीची प्रक्रिया सुरू: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अंतर्गत मतभेदांमुळे ‘इंडिया’चे नेते अस्वस्थ

Trinamool Congress: ‘तृणमूल’मधील फुटीचे लोण दिल्लीपर्यंत; वीस खासदारांचा वेगळा गट, ‘एनडीए’ला पाठिंब्यासाठी पत्र

निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती! सोलापूरच्या ‘आयटी पार्क’ची जागा कृष्णा खोरे नियामक मंडळाच्या ३० वर्षांच्या धोरणात अडकली; अभियंत्यांच्या निशिबी प्रतीक्षा

आजचे राशिभविष्य - 09 जून 2026

तिखट-चटपटीत मसाले आणि वितळलेलं चीज; हा 'बेल पेपर टोस्ट' सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठरतो परफेक्ट स्नॅक

SCROLL FOR NEXT