Trauma Types esakal
आरोग्य

Trauma Types : ट्रॉमा म्हणजे काय अन् त्याचे प्रकार किती? 'ही' थेरपी तुम्हाला करू शकते मदत

ट्रॉमामधून बाहेर पडण्यासाठी काही महत्वाचे उपाय जाणून घेऊयात.

साक्षी राऊत

Trauma Types : एखाद्या चिंताजनक स्थितीतूत जात असताना आपल्या ज्या प्रतिक्रिया असतात त्याला ट्रॉमा असे म्हणतात. ही स्थिती दीर्घकाळ असल्यास तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. ट्रॉमा हा नवा आणि जुना अशा दोन प्रकारचा असू शकतो. ट्रॉमा या स्थितीमागे बरीच कारणं असू शकतात. मात्र यामुळे व्यक्तिची संपूर्ण दिनचर्या प्रभावित होते. त्यामुळे या स्थितीतून वेळीच बाहेर येणे फार गरजेचे आहे. तेव्हा ट्रॉमामधून बाहेर पडण्यासाठी काही महत्वाचे उपाय जाणून घेऊयात.

ट्रॉमामधून बाहेर पडण्यासाठी थेरपी आणि हिलिंगची मदत तुम्ही घेऊ शकता. डॉ. चांदनी तुगनैत यांच्याकडून ट्रॉमा थेरपी आणि हीलिंगचे विविध प्रकार आज आपण जाणून घेऊयात.

ट्रॉमाचे आहेत एकूण एवढे प्रकार

सिंगल इंसिडेंट ट्रॉमा - या प्रकारचा ट्रॉमा एकमेव चिंतीत करणाऱ्या घटनेचा इशारा देतो. जसे, अपघात, हल्ला किंवा नैसर्गिक आपत्ती. याप्रकारच्या स्थितीत हीलिंगचा फोकस हा त्या विशिष्ट घटनेशी संबंधित भावनांवर असतो.

कॉम्प्लेक्स ट्रॉमा - जेव्हा एखाद्या व्यक्तीस दीर्घकाळापर्यंत दु:खद अनुभव येतात तेव्हा त्या स्थितीला कॉम्प्लेक्स ट्रॉमा असे म्हणतात. यात बालपणापासूनच चुकीची वागणूक, हिंसाचार यांसंबंधित ट्रॉमा यांचा समावेश असू शकतो. या स्थितीत ट्रॉमा किंवा हीलिंगचा उद्देश्य हा ट्रॉमाचा प्रभाव आणि लक्षणे कमी करणे हा असतो.

डेव्हलपमेंट ट्रॉमा - हा ट्रॉमा उपेक्षा, जवळीक किंवा बालपणापासूनचा एखादा ट्रॉमा याचे मुख्य कारण असू शकते. यात थेरपी आणि हीलिंगच्या माध्यमातून व्यक्तीच्या भावना, संबंध आणि सुरुवातीच्या दिवसांचा त्याच्यावर पडलेले प्रभाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

ट्रॉमा थेरपी

१) योगा आणि ध्यान - ट्रॉमा स्थितीत योग आणि ध्यान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे मन आणि हृदय शांत होते. यामुळे तणाव कमी होतो आणि तुम्हाला बरे वाटते.

२) आर्ट थेरपी: मनात आघात झाल्यास आर्ट थेरपीचीही मदत घेतली जाऊ शकते. यामध्ये संगीत, नृत्य इत्यादींचा समावेश असू शकतो.

३) एनर्जी : आघात झाल्यास एनर्जी बेस्ड थेरपी घेणे फायदेशीर ठरू शकते. यात चक्र संतुलन, एंजल हीलिंग, रेकी किंवा कलर थेरपी इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे शरीरातील ऊर्जेचा प्रवाह वाढतो. (Mental Health)

ट्रॉमा हीलिंग

१) माइंडफुल ब्रीदिंग : यामध्ये, मानसिक आघातांवर उपचार करण्यासाठी श्वासोच्छवासाचा सराव केला जाऊ शकतो. यामुळे तुमची नर्वस सिस्टिम रेग्युलेट करणे आणि रिलॅक्सेशन वाढवण्यास मदत होते. (Technology)

२) ग्राउंडिंग व्यायाम : ग्राउंडिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने आघात देखील हाताळले जाऊ शकतात. यासाठी ग्राउंडिंग ऑब्जेक्ट्स वापरा. सोबतच तुम्ही ग्राउंडिंग व्हिज्युअलायझेशनचा सराव करू शकता.

३) नेचर थेरपी : यामध्ये तुम्हाला निसर्गासोबत वेळ घालवायचा आहे. यामुळे तुमचे मन प्रसन्न होते. ताणतणाव कमी होऊन निसर्गाशी आसक्ती वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT