weight loss sakal
आरोग्य

Weight Loss: तुळशीच्या पानांनी कमी होतं वजन, कसं जाणून घ्या

तुळशीचे पाने खा अन् वजन कमी करा, वाचा सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

तुळस ही भरपूर औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. तुळशीला भारतामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. तुळशीला सूख-शांती आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. अनेक आजारांवर तुळशीचा उपाय आवर्जून केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का तुळशीच्या पानांमुळे वजन कमी होतं. हो, हे खरंय. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

  • तुळशीपासून बनवलेल्या चहात अजिबात कॅलरी नसतात, म्हणून त्याचे सेवन केल्यास वजन वाढत नाही. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आवर्जून दररोज तुळशीचा चहा प्यावा.

  • तुळशीच्या पानांनी आपले वजनही कमी करता येते. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चावून खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते

  • पचन शक्ती चांगली राहिल्यास वजन कमी करण्यास मदत होते. तुळशीची पाने खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. आतड्याची हालचाल चांगली होते, ज्यामुळे वजन कमी होण्याच्या मदत होते

  • तुळशीचे पाने खाल्ल्याने यकृत निरोगी राहते आणि यकृत हे शरिरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे वजन आपोआप कमी होतं.

  • सकाळी उपाशी पोटी तुळशीची पाने चावल्याने वजन कमी होतं

  • याशिवाय तुळशीची पाने शरीरातील चयापचय वाढवतात. ही पाने खाल्ल्याने चयापचयामध्ये सुधारणा होते आणि कॅलरी बर्न होतात. तेव्हा वजन वेगाने कमी होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT