Yoga For Piles esakal
आरोग्य

Yoga For Piles : मूळव्याध रूग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत या 2 योग मुद्रा, या पद्धतीने करा सराव

न्यूट्रिशनिस्ट आणि योगगुरू जुही कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

साक्षी राऊत

Yoga For Piles : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि बैठ्या कामामुळे अनेकांना मूळव्याधीची समस्या उद्भवते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मूळव्याध होतो तेव्हा गुदा आणि गुदाशयाच्या नसांमध्ये सूज येते, ज्यामुळे त्याला वेदना, खाज सुटणे, शौचास त्रास होणे, रक्तस्त्राव यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. जर तुम्हीही मूळव्याधच्या समस्येने त्रस्त असाल, तर तुमच्या डेली रुटीन लाइफमध्ये या 2 योगासनांचा समावेश करायला विसरू नका. न्यूट्रिशनिस्ट आणि योगगुरू जुही कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

मूळव्याध रुग्णांनी दररोज या दोन योगासनांचा सराव करावा-

सहज शंख मुद्रा

सहज शंख मुद्रेचा सराव केल्याने मूळव्याध असलेल्या रुग्णांची पचनशक्ती सुधारते आणि त्यांना बद्धकोष्ठता आणि वेदनांच्या त्रासातून आराम मिळतो. सहज शंख मुद्रा करण्यासाठी सर्वप्रथम मांडी घालून बसावे.

यानंतर, आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकांना जोडताना आपले अंगठे एकत्र ठेवा. तुमचे दोन्ही अंगठे बोटांवर दाबा. हातांची ही मुद्रा कायम ठेवून नाभीच्या वर ठेवा आणि श्वास आणि श्वास सोडत रहा. सुमारे 15 मिनिटे या मुद्रेचा सराव करा. (Health)

प्राण मुद्रा

पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी प्राण मुद्रेचा सराव खूप फायदेशीर मानला जातो. या मुद्रेच्या नियमित सरावाने बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि छातीतील जळजळ दूर होण्यास मदत होते. प्राण मुद्रा करण्यासाठी सर्वप्रथम पद्मासनात बसून आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर ठेवून तळवे वर ठेवावेत. यानंतर, आपल्या करंगळीची टोके आणि अनामिका अंगठ्याच्या टोकाने जोडा. हे करताना तुमची मधली बोटे आणि तर्जनी सरळ राहतील. शिवाय या मुद्रेत असताना दीर्घ श्वास घ्या. (Yoga)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT