Diabetes google
आरोग्य

Types of Diabetes : मधुमेहाचा कोणता प्रकार आहे सर्वांत घातक ?

गर्भावस्थेतच हा मधुमेह जडतो, याचा परिणाम मातेवर आणि भ्रूणावर दोघांवरही होऊ शकतो.

नमिता धुरी

मुंबई : मधुमेह एक अशी समस्या आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही. ही समस्या शरीरात निर्माण होणाऱ्या इन्सुलिनला अडथळा निर्माण होण्याने उद्भवते किंवा शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नसल्यानेही उद्भवते.

इन्सुलिन हा घटक स्वादुपिंडामध्ये तयार होत असतो. हे इन्सुलिन आपल्या शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या ग्लुकोज किंवा साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्याचं काम करत असतं. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या वोक्हार्ट रुग्णालयाचे सल्लागार हृदय शल्यविशारद डॉ. गुलशन रोहरा यांच्याकडून.  हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

मधुमेहाचे सर्वसामान्यपणे 3 प्रकार असतात

टाईप 1 मधुमेह (लहानपणी किंवा तरुणपणात जडणारा मधुमेह) - यावर उपाय नसतो, या प्रकारच्या रुग्णाला नियमितपणे इन्सुलिन घ्यावे लागते.

टाईप 2 मधुमेह - हा मधुमेह प्रौढांनाही होऊ शकतो आणि लहान मुलांना देखील. सर्वसाधारणपणे लठ्ठ व्यक्तींना या प्रकारच्या मधुमेहाची लागण होते. या प्रकारचा मधुमेह हा निव्वळ आहार नियंत्रण आणि औषधोपचांरानी किंवा दोन्ही मार्गांच्या एकत्रित अवलंबाने नियंत्रित करता येतो.

गर्भावस्थेत जडणारा मधुमेह - गर्भावस्थेतच हा मधुमेह जडतो, याचा परिणाम मातेवर आणि भ्रूणावर दोघांवरही होऊ शकतो. या प्रकारच्या मधुमेहामुळे भ्रूणामध्ये व्यंग निर्माण होणे, अवेळी प्रसुती, लठ्ठ बाळ होणे किंवा बाळाला जन्मापासूनच मधुमेहाची लागण होणे हे धोके संभवतात.

रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढतं, मात्र मधुमेह जडला आहे हे म्हणण्याइतकं ते वाढत नाही तेव्हा टाईप 2 मधुमेह आणि मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

मधुमेहामध्ये रक्तातील वाढलेले ग्लुकोज हे रक्तवाहिन्यांवर परिणाम करत असते. हळूहळू वाढलेले ग्लुकोज हे हृदय, डोळे आणि मूत्रपिंडावरही परिणाम करू लागते. मधुमेहामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची किंवा हृदयविकार होण्याची शक्यता दुप्पट किंवा तिप्पट होते.

मधुमेहामुळे मज्जातंतूंना हानी पोहोचते आणि वाहिन्यांमधील रक्ताचा प्रवाह मंदावतो, ज्याचा परिणाम हा डोळ्यांवर, मूत्रपिंडे निकामी होणे, अल्सर होणे किंवा संसर्ग होणे असा होऊ शकतो. अतिताण आणि कोलेस्ट्रॉलचे अतिप्रमाण हे धमन्यांसाठी अतिधोकादायक ठरते.

हृदयातील धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होत जाते ज्यामुळे धमन्या जाम होतात आणि हृदयविकाराचा झटका येतो. हा संपूर्ण जगात आढळणारा हृदयविकार आहे.

हृदय बंद पडणे - यामध्ये हृदय पुरेशा प्रमाणात शरीराला रक्त पंप करू शकत नाही, म्हणजेच शरीराला पुरेसा रक्तपुरवठा करू शकत नाही.

कार्डीओमायोपथी - हृदयाचे स्नायू कमजोर होणे

जगभरातील असंख्य लोकांना मधुमेह झाला आहे आणि मधुमेहाची लागण होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. अनुवांशिक पद्धतीने काहींना मधुमेह होतो तर काहींना अरबट, चरबट खाणे, धुम्रपान किंवा दारू पिण्याने होतोय.

नुकतीच एका तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णाचं वय अवघं 32 वर्षे इतकं होतं. त्याचं काम हे बैठ्या स्वरुपाचं होतं आणि त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील वाईट होत्या. थोड्याशा चढणीवरही त्याच्या छातीत दुखायला लागायचं. त्याची टीएमटी (ट्रेड मिल टेस्ट) केली असता इंड्युसिबल इस्केमिया हा पॉझिटीव्ह आला होता (म्हणजेच त्याच्या हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नव्हता.)

या रुग्णाची आणखी तपासणी केली असता त्याला टाईप-2 प्रकारचा मधुमेह झाल्याचे कळाले होते. अँजिओग्राम चाचणीमध्ये त्याच्या धमन्यांमधून रक्तप्रवाह नीट होत नसल्याचे दिसून आले होते. यामुळे त्याच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्यानंतर हा रुग्ण बरा झाला.

मधुमेहामुळे होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचे उचलायचे पाऊल म्हणजे योग्य वेळी निदान होणे आणि मधुमेहामुळे होणाऱ्या समस्यांविषयी पूर्ण माहिती मिळवणे. तज्ज्ञ डॉक्टरांशी बोलून निदान कसे करावे याचे विविध मार्ग जाणून घेणे गरजेचे आहे.

मधुमेहाचे अचूक निदान करण्यासाठी प्रभावी आणि परवडणाऱ्या चाचण्या उपलब्ध आहे. निरोगी जीवनशैली अवलंबणे गरजेचे आहे. सात्विक आणि वेळेवर जेवण, धुम्रपानाचा त्याग, नियमित व्यायाम, वजन कमी करणे यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतल्याने बराच फरक पडतो.

गोळ्यांच्या माध्यमातून किंवा इंजेक्शनच्या माध्यमातून, शरीरातील इन्सुलिनची मात्रा नियंत्रित राखणे गरजेचे असते. तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही ठरवू शकता. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे.

रक्तातील साखर कमी झाली किंवा वाढली तर काय करावे, मधुमेहावरील औषधांचे दुष्परिणाम काय आहेत, मधुमेहाची औषधे आणि इतर औषधे एकत्र घेतल्यास त्याचा काय परिणाम होऊ शकतो याबाबत माहिती घेऊन त्यानुसार काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT