hairfall  
आरोग्य

केसगळतीवर उपचार न केल्यास पडणार टक्कल; डीएचटी थेरपीतून उपचार...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : धकाधकीच्या जीवनात निष्काळजीपणा व चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीरावर परिणाम होतो. त्यातच शिक्षण, नोकरी, कामाचा ताण, अनियमित दिनचर्या, असंतुलित आहार, वातावरणातील बदल, धावपळ, विविध प्रकारचे प्रदूषण व अर्धवट झोपेमुळे ऐन तारुण्यातच टक्कल पडण्याची भीती वाढली आहे.

टक्कल पडल्यानंतर औषधोपचारांपेक्षा पूर्वीच खबरदारी चांगली हा विचार तरुणाईच्या मनात रुजत असल्यानेच मेडिकलच्या त्वचारोग विभागात तरुणांची संख्या वाढली आहे. दररोज पाच तासांमध्ये केसांच्या समस्यांवर उपचाराचे कवच मिळावे यासाठी ३० जण उपचाराला येतात.

महिन्याला १ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. मेडिकलच्या त्वचारोग विभागात उन्हाळ्याच्या दिवसात रुग्णांची संख्या वाढते. बाह्यरुग्ण विभागात दररोज सरासरी २०० रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र उन्हाळ्यात ही संख्या ३०० च्या वर जाते.

बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांपैकी दररोज ३० रुग्ण केसगळतीची व्यथा घेऊन येतात. यात १८ ते ४० वयोगटातील मुला-मुली असतात. ४० वर्षांवरील वयोगटातील रुग्णांची संख्या देखील जास्त आहे. केसांच्या समस्या असलेल्या रुग्णांवर उपचार किमान तीन महिने आणि जास्तीत जास्त वर्षभर चालतात.

टक्कल पडण्यास कारणीभूत घटक

जंक फूडचे वाढलेले सेवन.

आहारातून प्रथिने, जीवनसत्त्व, खनिजांचे प्रमाण हरवले

योग्य आहाराअभावी डीएचटी हार्मोनची वाढ

धूम्रपान करणाऱ्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते.

निकोटिनमुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो.

या आजारांमुळे केस गळती

थायरॉइडची समस्या : हॉर्मोन्सच्या पातळीवर नियंत्रण ठेवणाऱ्या थायरॉईड ग्रंथीचे काम व्यवस्थित होत नसल्यास केसगळती होते.

एलोपेशिया एरियाटा (चाई)ः शरीरातील प्रतिकार यंत्रणा केसांच्या मुळावर आक्रमण करते. या विकारात केसांचे मऊ, गोलाकार पुंजके गळतात.

त्वचाविकार : लायकेन प्लॅनस किंवा ल्युपसच्या काही प्रकारांत पडणाऱ्या भेगांमुळे केसगळती होते.

३ महिने ते १ वर्ष उपचाराची गरज

केसगळतीची प्रारंभिक अवस्था ः तीन महिने औषधांची गरज

केसगळतीची दुसऱ्या टप्प्यातील अवस्था ः सहा महिन्यांपर्यंत पीआरपी (प्लेटलेट रिच प्लाझ्मा) थेरपीतून उपचार

"कॅन्सर, आर्थरायटिस, नैराश्य, हृदयविकार, उच्च रक्तदाब या आजारावर उपचारादरम्यान औषधांचा परिणाम होतो. यातून केस गळती होते, मात्र केस पुन्हा येतात. अलीकडे केसांना कलर करण्याची चुकीची सवय तरुणाईला लागली आहे. याच्या परिणामांकडे आपण दुर्लक्ष करतो. केसांना कलर केल्यामुळे अनेकदा इन्फेक्शन किंवा ॲलर्जी होते. त्यामुळे स्किनवर रॅशेज येतात. अनेकदा ही ॲलर्जी आरोग्यासाठी घातकही ठरू शकते."

- डॉ. जयेश मुखी, त्वचारोग विभाग प्रमुख, मेडिकल नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait : होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची प्रचंड रांग; इराणने कडक नियम जाहीर केले, ४८ तास आधी अर्ज अनिवार्य

Rain Forecast In Maharashtra : पर्जन्यमानात सुधारणा! महाराष्ट्रात पावसाला वेग येणार; २३ जूननंतर राज्यभर सर्वदूर पाऊस, IMD चा अंदाज

Latest Marathi Live Updates: सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र एकीकरण समितीला कर्नाटकात अडवले, ठिय्या आंदोलन

PM Kisan Yojna: बळीराजाच्या खात्यात ‘सन्मान’चा वर्षाव! ‘पीएम किसान’च्या २३व्या हप्त्याचे आज वितरण; ३१ कोटी ४४ लाख होणार जमा

धक धक गर्ल माधुरी दीक्षितला कांदेपोहे प्रचंड आवडतात! परंतु तिची सीक्रेट रेसिपी तुम्हाला माहिती का? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT