homeopathy sakal
आरोग्य

उपयुक्त होमियोपॅथी

आपण आयुर्वेद आणि त्यातील जुनाट आजारांविषयीची उपयुक्त माहिती घेतली. आता आपण होमियोपॅथीबद्दल माहिती घेणार आहोत.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. मृण्मयी मांगले, MBBS, Chronic disease reversal expert

आपण या लेखमालेमध्ये जुनाट आजारांशी दोन हात कसे करायचे हे पाहत आहोत. जुनाट आजार म्हणजे नेमकं काय, त्यांची कारणे, ते टाळण्यासाठी योग्य आहार व जीवनशैली हे आपण पाहिले. त्याच सोबत आपण आयुर्वेद आणि त्यातील जुनाट आजारांविषयीची उपयुक्त माहिती घेतली. आता आपण होमियोपॅथीबद्दल माहिती घेणार आहोत.

होमियोपॅथीच्या औषधांमध्ये काहीही औषधी घटक नसून फक्त रुग्णाचे मनोबल वाढवून placebo इफेक्टमुळे रुग्णाला बरे वाटू लागते, असा आरोप केला जातो; परंतु आता रिसर्चमध्ये हे सिद्ध झाले आहे, की होमियोपॅथीची औषधे पेशींवर काम करतात; तसेच ती ज्या पदार्थापासून बनली आहेत त्या पदार्थांचे संपूर्ण गुणधर्म त्यांच्यामध्ये उतरलेले असतात.

हे एक परिपूर्ण वैद्यकीय शास्त्र आहे व जुनाट आजारांमध्ये याची उपयुक्तता गेल्या काही वर्षांमध्ये अनेक पटीने वाढलेली आहे. जागतिक पातळीवर ॲलोपॅथीनंतर सर्वांत वापरली जाणारी औषधोपचार पद्धती ही होमियोपॅथी आहे.

होमिओपॅथीचा इतिहास

सुमारे दोनशे वर्षांंपूर्वी होमियोपॅथी या उपचारपद्धतीचा उगम जर्मनी येथे झाला. तिचे जनक डॉ. सॅम्युल हानेमन आहेत. डॉ. हानेमन हे ॲलोपॅथीमध्ये एमडी मेडिसिन केलेले डॉक्टर होते. होमियोपथी म्हणजे समचिकित्सा पद्धती आणि डॉ. हानेमन यांनीच ॲलोपॅथी (विरुद्ध चिकित्सा पद्धती) हे नाव दिले. होमिओपॅथी भारतामध्ये १९०० च्या सुमारास आली आणि इतक्या झपाट्याने वाढत गेली, की आज जगातील सर्वांत अधिक होमियोपथी डॉक्टर हे भारतात आहेत.

होमियोपॅथीचा जन्म

हानेमन हे ॲलोपॅथीक डॉक्टर असूनही त्यांना त्या काळची ॲलोपॅथी औषधोपचार पद्धती आवडत नसे, कारण त्यामध्ये अत्यंत कठोर उपचार असत, ज्याचे अनेक तोटे रुग्णाला होत. यामुळे हानेमन यांनी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करणे सोडून टाकले होते. ते आठ भाषांमध्ये निपुण असल्यामुळे सात वर्षांसाठी त्यांनी उदरनिर्वाहासाठी केवळ भाषांतराचे काम केले व विलियम क्युलेन या शास्त्रज्ञाच्या एक पुस्तकाचा अनुवाद करताना त्यांनी एक परिच्छेद वाचला : सिंकोना या झाडाचे साल सेवन केल्याने मलेरिया या आजारासारखी लक्षणे आपल्या शरीरात दिसून येतात.

हे वाचून हानेमन यांनी स्वतःवर प्रयोग करून पहिला व खरंच त्यांना मलेरियासारखी लक्षणं आली. याच वेळी होमियोपॅथीचा जन्म झाला व ‘सीमिलिया सीमिलिबस कयूरेन्टर’ (काट्याने काटा काढणे) या मुख्य प्रणालीचा जन्म झाला.

होमियोपॅथीची मुख्य कार्यप्रणाली व ही औषधे आपल्या आरोग्यावर नेमकी कशी परिणाम करतात हे आपण पुढच्या भागांत बघूया!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT