Vitamin D Deficiency  esakal
आरोग्य

Vitamin D Deficiency : महिलांनो शरीरातील Vitamin D ची कमतरता ठरू शकते घातक, इग्नोर करू नका; नाहीतर..

आज आपण व्हिटॅमिन डी मुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांबाबत जाणून घेऊया.

साक्षी राऊत

Vitamin D Deficiency : हल्ली लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता खूप सामान्य झाली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे लोक त्यांचा जास्तीत जास्त वेळ घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये घालवतात. त्यामुळे उन्हाशी त्यांचा संपर्क कमी येतो. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. तेव्हा सर्वांनी सकाळी किंवा संध्याकाळी किमान 10-15 मिनिटे सूर्यप्रकाशात घालवली पाहिजे.

व्हिटॅमिन डीला सूर्यप्रकाशातील जीवनसत्व असे देखील म्हटले जाते कारण आपल्या शरीराला सूर्यप्रकाशातून उर्जी मिळते. व्हिटॅमिन डीची कमतरता फक्त स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही दिसून येते. मात्र या जीवनसत्वाची कमतरता पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक घातक ठरू शकते. कारण महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन फार लवकर बिघडते.

व्हिटॅमि डी शरीरात हार्मोप्रमाणे कार्य करते आणि शरीरातील इतर हार्मोन्स बॅलेंस करण्यास मदत करते. महिलांमध्ये या व्हिटॅंमिनची कमतरता झाल्यास हार्मोनल इम्बॅलेंसह इतर अनेक समस्याही उद्भवू शकतात. आता अनेकांना पडणारा प्रश्न असा की, महिलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता झाली हे कसं कळेल? फिटनेस कोच आणि न्यूट्रिशनिस्ट अक्षय एस शेट्टींच्या मते, व्हिटॅमिन डी ची कमतरता झाल्यास शरीरात अनेक लक्षणे दिसून येतात. चला तर आज आपण व्हिटॅमिन डी मुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांबाबत जाणून घेऊया.

महिलांमध्ये व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे दिसतात ही लक्षणे

दिवसभर थकवा जाणवणे

हाडांमध्ये दुखणे जाणवणे

अशक्तपणा

मांसपेशींमध्ये दुखणे

मूड स्विंग आणि चिडचिडेपणा (Vitamin D)

शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी भरून काढाल

उन्हात बसा - रोज सकाळी किंवा संध्याकाळी १०-१५ मिनिट उन्हात बसा.

व्हिटॅमिन डी रिच फूड खा - आहारात व्हिटॅमिनयुक्त पदार्थ खा. उदा - दूध, अंडी, मशरूम, दही, पनीर, फॅटी फिश यांसारखे पदार्थ

आतड्यांना निरोगी ठेवा - आहारात प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स घ्या. हे आतड्यांमधील हेल्दी बॅक्टेरिया वाढवतात. त्यामुळे पचनशक्ती सुधारते आमि पोषक तत्वे शोषून घेण्याची प्रक्रिया नीट होते. (Health)

सप्लीमेंट्स घ्या - व्हिटॅमिनची कमतरता पूर्ण करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानतुम्ही व्हिटॅमीन डी च्या सप्लिमेंट्सही घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT