Vitamin D Deficiency esakal
आरोग्य

Vitamin D Deficiency : ‘व्हिटॅमिन डी’ च्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवतो? मग, आहारात ‘या’ हेल्दी ड्रिंक्सचा करा समावेश

Vitamin D Healthy Drinks : संतुलित आहारामध्ये विविध प्रकारचे पोषकघटक, जीवनसत्वे आणि खनिजांचा समावेश असणे गरजेचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Vitamin D Healthy Drinks : आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम अतिशय महत्वाचा आहे. संतुलित आहारामध्ये विविध प्रकारचे पोषकघटक, जीवनसत्वे आणि खनिजांचा समावेश असणे गरजेचे आहे. या जीवनसत्वांमध्ये समाविष्ट असलेले व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. व्हिटॅमिन डी हे एक असे पोषकतत्व आहे की, ज्याच्या कमतरतमुळे आपले शरीर कमकुवत होऊ शकते.

हे जीवनसत्व आपल्याला प्रामुख्याने सूर्यप्रकाशातून मिळते. परंतु, तुम्ही सूर्यप्रकाशात कमी वेळ घालवल्यामुळे शरीराला त्याची कमतरता भासू शकते. केस गळणे, हाडे कमकुवत होणे, स्नायू दुखणे, थायरॉईड, प्रतिकारशक्ती कमी होणे, अशक्तपणा येणे ही सर्व व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची लक्षणे आहेत.

ही लक्षणे दूर करण्यासाठी तुम्ही आहारात व्हिटॅमिन डी ने युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करायला हवा. तुम्ही काही खाद्यपदार्थांच्या मदतीने आणि काही पेयांच्या मदतीने ही व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात, व्हिटॅमिन डी ने परिपूर्ण असलेल्या हेल्दी ड्रिंक्सबद्दल.

गाजरचा ज्यूस

गाजरला व्हिटॅमिन डीचा उत्तम स्त्रोत म्हणून ओळखले जाते. गाजरामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटक आढळतात. व्हिटॅमिन डीसोबतच, व्हिटॅमिन ए आणि सी देखील गाजरामध्ये विपुल प्रमाणात आढळते. ही जीवनसत्वे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत.

त्यासोबतच डोळे आणि त्वचा यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी गाजरचा ज्यूस लाभदायी आहे. हा ज्यूस प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे, व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करण्यासाठी तुमच्या आहारात गाजराच्या ज्यूसचा समावेश करा.

संत्र्याचा ज्यूस

संत्रा हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. संत्र्याला व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी चा प्रमुख स्त्रोत म्हणून ओळखले जाते. ही दोन्ही जीवनसत्वे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच, त्वचेचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे, तुमच्या आहारात संत्र्याचा ज्यूस अवश्य समाविष्ट करा.  

ताक

ताक हे प्रामुख्याने दह्यापासून बनवले जाते. दह्यामध्ये काही प्रमाणात पाणी मिसळून त्यापासून ताक बनवले जाते. ताकामध्ये कॅल्शिअम, फायबर्ससोबतच व्हिटॅमिन डी देखील आढळते. त्यामुळे, व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी ताकाचा आहारात अवश्य समावेश करा. ताक प्यायल्याने शरीर थंड ठेवण्यास मदत होते. तसेच, पचनक्षमता सुधारते. त्यामुळे, तुमच्या आहारात ताकाचा अवश्य समावेश करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT