Vitamin Deficiency esakal
आरोग्य

Vitamin Deficiency : अजूनही माती खावीशी वाटते? ही असू शकतात कारणं, आजच भेटा डॉक्टरांना

हा एकप्रकारचा शारीरिक व मानसिक आजारच आहे.

धनश्री भावसार-बगाडे

- डॉ. रचनील कमाविसदार, आयुर्वेदतज्ज्ञ (बालरोग), नागपूर.

लहानपणी माती, पाटीवरची पेन्सील, दगडी पाटी तोडून त्याचे तुकडे व पेन्सिलचे टोक खाणे, भिंत चाटणे, गव्हातले खडे खाणे असे मातीसदृश्य पदार्थ खाणे अनेकांमध्ये दिसून येत. ही सवय आजही अनेक मुलांमध्ये दिसते. कळत न कळत ही सवय लागते. पुढे एकप्रकारचे व्यसनच जडते. काहींची ही सवय मोठे झाल्यावरही जात नाही. अशा सर्व वस्तू खाण्याची सवय असेल तर त्याला ‘पायका’ किंवा पिका असे म्हटले जाते. हा एकप्रकारचा शारीरिक व मानसिक आजारच आहे. आयुर्वेदामध्ये याला मृदभक्षणजन्यपाण्डु असे संबोधन असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.

लहान मुलांमध्ये प्रमाण अधिक

मृदभक्षणजन्यपाण्डु मधील ‘मृद’ म्हणजे माती, ‘भक्षण’ म्हणजे खाणे आणि ‘पांडू’ म्हणजे ऍनिमिया. थोडक्यात, खाण्याच्या चुकीच्या सवयीस पायका असे म्हणतात. लहान मुलांमध्ये व गरोदर महिलांमध्ये माती वा गव्हातले खडे खाण्याची इच्छा होत असल्याचे दिसते. वयाच्या पहिल्या वर्षापासून ते दात येईपर्यंत लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. त्या वयात लहान मुलांमध्ये ते लक्षणे साधारण समजली जातात. वयाची चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर या सवयी हळूहळू जातात. मात्र ही सवय गेली नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

माती खाण्यास कारण की...

  • शरीरात लोहाची कमतरता असणे

  • शरीरात झिंक व कॅल्शिअमची कमतरता असणे

  • रक्ताची कमतरता असलेल्या व्यक्तीला ही सवय जडते

  • काही ठिकाणी मानसिक तणावामुळे ही सवय लागते

परिणाम

  • पोटात जंत होणे

  • जुलाब होणे

  • कुपोषण

  • भूक न लागणे

  • अशक्तपणा

  • मानसिक समस्या

  • स्क्रिझोफेनियाचे संकेत

  • ऑबसेसिव्ह कंपस्लिव्ह डिसऑर्डर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

SCROLL FOR NEXT