Vitamins For Eyes esakal
आरोग्य

Vitamins For Eyes : डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचं आहे 'हे' व्हिटॅमिन; असा करा आहारात समावेश

Vitamins For Eyes : शरीराच्या सर्वात नाजूक अवयवांपैकी एक म्हणजे आपले डोळे होय. त्यामुळे, डोळ्यांची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Vitamins For Eyes : शरीराच्या सर्वात नाजूक अवयवांपैकी एक म्हणजे आपले डोळे होय. त्यामुळे, डोळ्यांची खास काळजी घेणे गरजेचे आहे. डोळ्यांचे बाहेरून संरक्षण करण्यासोबतच त्यांचे पुरेशा प्रमाणात अंतर्गत पोषण होणे देखील आवश्यक आहे. डोळ्यांचे अंतर्गत पोषण करण्यासाठी संतुलित आहार फार महत्वाचा आहे.

आपल्या रोजच्या आहारात विविध प्रकारच्या जीवनसत्वांचा आणि खनिजांचा समावेश असणे महत्वाचे आहे. यामुळे, आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. यासोबतच हा आहार आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळ दृष्टी टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो.

खरं तर या जीवनसत्वांची आणि पोषकघटकांची कमतरता निर्माण झाली की, वयासोबतच आपली दृष्टी कमी होते. ही दृष्टी कमी होण्यामागचे हेच प्रमुख कारण आहे. डोळ्यांची दृष्टी दीर्घकाळ टिकवून ठेवायची असेल आणि डोळ्यांची योग्य काळजी घ्यायची असेल तर आहारात काही व्हिटॅमिन्सचा जरूर समावेश करा. या व्हिटॅमिन्समुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. कोणते आहेत हे व्हिटॅमिन्स? चला तर मग जाणून घेऊयात.

व्हिटॅमिन ई

डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ई ने युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणे महत्वाचे आहे. व्हिटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंन्ट्स आहे, जे डोळ्यांच्या तणावाला दूर करण्यास मदत करते. इतकेच नव्हे तर पेशींचे संरक्षण करते.

पालक, शेंगदाणे, बीट, सूर्यफूल, बदाम आणि मोहरीच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई चे पुरेसे प्रमाण आढळून येते. त्यामुळे, तुमच्या आहारात व्हिटॅमिन ई ने युक्त असलेल्या या खाद्यपदार्थांचा समावेश करायला अजिबात विसरू नका. (Vitamin E)

व्हिटॅमिन ए

डोळ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्वात महत्वाच्या पोषकतत्वांपैकी एक म्हणून या व्हिटॅमिन ए ला ओळखले जाते. या व्हिटॅमिन ए ला रेटिनॉल असे ही म्हटले जाते. हे व्हिटॅमिन डोळ्यांना निरोगी ठेवण्याचे काम करते.

हिरव्या पालेभाज्या, गाजर, रताळे, भोपळा, टोमॅटो, लाल शिमला मिरची, टरबूज, आंबा इत्यादी खाद्यपदार्थांमध्ये व्हिटॅमिन ए चे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, या खाद्यपदार्थांचा तुमच्या आहारात जरूर समावेश करा. (Vitamin A)

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन ई आणि ए प्रमाणेच व्हिटॅमिन सी हे आपल्या डोळ्यांसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. अँटिऑक्सिडंन्ट्सने युक्त असलेले हे व्हिटॅमिन आपल्या डोळ्यांचा हानिकाराक असलेल्या मुक्त रॅडिकल्सपासून बचाव करण्याचे काम करते. यासोबतच व्हिटॅमिन सी ने युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचे नियमितपणे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

लिंबूवर्गीय फळे, मोसंबी, संत्रा, लिंबू या फळांमध्ये व्हिटॅमिन सी चे भरपूर प्रमाण आढळून येते. यासोबतच स्ट्रॉबेरी, ब्रोकोली, काळी मिरी इत्यादी खाद्यपदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी चे विपुल प्रमाण आढळून येते. त्यामुळे, या सर्व खाद्यपदार्थांचा आहारात अवश्य समावेश करा. (Vitamin C)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT