Walk For Weight Loss
Walk For Weight Loss esakal
आरोग्य

Walk For Weight Loss : महिन्याभरात 10 किलो वजन कमी करायचंय? मग रोज किती चालयला हवं, जाणून घ्या

धनश्री भावसार-बगाडे

How Much Daily Walk is Necessary To Lose 10 Kg Weight :

वजन कमी करणे हे कोणत्याही मोठ्या चॅलेंजपेक्षा कमी नाही. बरे प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही. कही लोक कमी प्रयत्नातही पटकन वजन घटवतात तर काहींना कितीही मेहनत घेतली तरी परिणाम दिसून येत नाही.

त्यामुळे लोकांना कायम प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी रोज किती चालणे आवश्यक आहे, १० किलो वजन कमी करण्यासाठी किती चालावे जाणून घेऊया.

Walk For Weight Loss

100 कॅलरी बर्न करण्यासाठी 2 किलोमीटर चालणे आवश्यक

वजन कमी करण्यासाठी किती किलोमीटर रोज वॉक करायला हवे, यासाठी फुलप्रुफ पद्धत नसते. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अनुभव असू शकतात. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार १ मील म्हणजे १.६ किलोमीटर चालण्याने ५५ ते १४० कॅलरी बर्न होतात. हे तुमच्या चालण्याच्या वेगावर अवलंबून आहे.

ब्रिटीश नॅशनल हेल्थ सर्व्हीसनुसीर रोज कमीत कमी १५० मिनीटची मॉडरेट वॉक करायला हवा. जर तुम्ही फास्ट वॉक करत असाल तर ७५ मिनीट करू शकतात.

तसही आज रोज १० हजार पावले चालण्याचा सल्ला दिला जातो. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की, किती चालल्याने किती किलो वजन कमी होऊ शकते? याचं उत्तर म्हणजे ते प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. काही लोक एका महिन्याच्या आत १० किलो वजन कमी करतात तर काही लोकांना १० किलो वजन कमी करण्यासाठी २ महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागतो. यासाठी अनेक घटक जबाबदार असतात.

Walk For Weight Loss

वजन कमी करण्यासाठी हे घटक जबाबदार असतात

साधारणपणे, वजन कमी करण्यासाठी वेगवान चलण्यास सांगितले जाते. वेगवान व्यायाम म्हणजे जेव्हा तुम्ही चालता तेव्हा त्याचा वेग कमीत कमी ६ किलोमीटर प्रति तास असावा. जर कोणी यापेक्षा अधिक वेगाने चालत किंवा धावत असेल तर त्यांचे वजन लवकर कमी होते.

फक्त चालल्याने वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी डाएटवरही कंट्रोल असणे आवश्यक असते. अनहेल्दी गोष्टी डाएटमधून काढून टाकाव्या. शिवाय डाएटचे प्रमाणही कमी करणे गरजेचे असते. शिवाय योग्य झोप आणि तणावमुक्ती जीवन आवश्यक आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT