Walking Benefits
Walking Benefits  esakal
आरोग्य

Walking Benefits : हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी चालणं हा उत्तम व्यायाम

सकाळ वृत्तसेवा

Walking Benefits : मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी जास्तीत जास्त चालणे फायदेशीर असते. यामुळे मूडही चांगला राहतो आणि शारीरिक ऊर्जा वाढते. हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी चालणं हा उत्तम व्यायाम आहे, असं या तज्ज्ञ डॉक्टर सांगतात..

कॅलरीज कमी...

चालण्याने अतिरिक्त कॅलरीज कमी होण्यास उपयोग होतो. भरभर चालण्याने कॅलरीजचं प्रमाण कमी होतं. शरीरात ऊर्जासुद्धा निर्माण होते. कॅलरीजचं सेवन संतुलित हवे. धावणे, पोहणे, सायकल चालवल्याने जेवढ्या कॅलरीज कमी होतात तेवढ्याच जलद चालण्याने होतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी चालणे उत्तम व्यायाम आहे. चालल्याने रक्तातील पांढऱ्या रक्तपेशी प्रमाणात वाढतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. कोणत्याही रोगाचा सामना करण्यासाठी शरीर सज्ज होते.

ताण हलका...

साधारण तीस मिनिटे चालल्याने मूड चांगला राहण्यास मदत होते, असं संशोधनांती सिद्ध झाले आहे. यामुळे ताण हलका होतो. नैराश्याला सामोरे जाणाऱ्यांना अधिकाधिक चालण्याचा सल्ला दिला जातो. मनावर ताण जाणवत असल्यास किंवा टेन्शन आल्यास क्षमतेनुसार वेगाने चाला.

रक्तप्रवाह सुरळीत

चालण्याने रक्तप्रवाहाची प्रक्रिया सुरळीत पार पडते. ऑक्सिजन आणि इतर पोषणमूल्ये शरीराच्या सर्व भागांत पोहोचतात. परिणामी, शारीरिक क्रिया करण्यास ऊर्जा मिळते आणि मूडही चांगला राहतो, असं तज्ज्ञ सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT