Ginger Candy Recipe esakal
आरोग्य

Ginger Candy Recipe : बदलत्या ऋतूत वारंवार खोकला उद्भवतोय? ही कँडी ठरेल फायद्याची, वाचा रेसिपी

आज आम्ही तुमच्यासाठी असा घरघुती उपाय घेऊन आलोय ज्याने तुमची सर्दी खोकल्याची समस्याह दूर होईल

सकाळ ऑनलाईन टीम

Ginger Candy Recipe : बदलत्या ऋतूमुळे सर्दी खोकल्याच्या समस्या उद्भवतात. मात्र सर्दी खोकल्यासाठी वारंवार औषध घेणे योग्य नाही. आज आम्ही तुमच्यासाठी असा घरघुती उपाय घेऊन आलोय ज्याने तुमची सर्दी खोकल्याची समस्याही दूर होईल आणि तुम्हाला वारंवार औषधं घेण्याचीही गरज भासणार नाही.

आज आपण जिंजर कँडीची रेसिपी जाणून घेणार आहोत. ही कँडी खायलाही टेस्टी असेल आणि तुमच्या सर्दी खोकल्याच्या समस्याही दूर होतील. तुम्ही अशीसुद्धा ही आरोग्यदायी कँडी खाऊ शकता.

जिंजर कँडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • ४-५ आल्याचे पीस

  • तूप १ ते २ टीस्पून

  • काळे मीठ १ टीस्पून

  • हळद १ टीस्पून

  • काळी मिरी १ टीस्पून

  • २ ते ३ बटर पेपर

आले कँडी कशी बनवायची ?

  • सर्वप्रथम आले चांगले धुवून वाळवा.

  • आता ते थेट गॅसच्या आचेवर ठेवा आणि ते नीट भाजून घ्या.

  • नीट भाजल्यावर त्याचा वरचा पृष्ठभाग काळा पडल्यावर ताटात ठेवा.

  • त्यांना एका प्लेटमध्ये ठेवून थंड करा आणि नंतर चमच्याने किंवा चाकूच्या मदतीने सोलून घ्या.

  • आता चाकूने त्यांचे छोटे तुकडे करा आणि मिक्सरच्या ब्लेंडरमध्ये ठेवून बारीक करा.

  • आता गॅसवर तवा ठेवा आणि त्यात एक चमचा तूप टाका. आता ही आले पेस्ट पॅनमध्ये चांगली परतून घ्या. (Health)

  • चांगले भाजून झाल्यावर त्यात ३०० ग्रॅम गूळ टाका.

  • सर्व गूळ मेल्ट होईपर्यंत चमच्याने ढवळत राहा.

  • गूळ पूर्णपणे मेल्ट झाल्यावर त्यात काळे मीठ, हळद आणि काळी मिरी घालून शिजवा.

  • आता चमच्याच्या मदतीने हे द्रावण बटर पेपरवर सगळ्या बाजून एक इंच उंचीत ओतून सेट होऊ द्या.

तुमची जिंजर कँडी तयार आहे. ही जिंजर कँडी एरवीही तुम्ही खाऊ शकता. याची टेस्ट चॉकलेटपेक्षा वेगळी अलसी ती खायला चविष्ट वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT