Weather Update 
आरोग्य

थंडीच्या काळात घ्या आरोग्याची काळजी

थंडीत विषाणूजन्य आजार होण्याची शक्‍यताही असते

सम्राट कदम

पुणे : दिवाळी पाठोपाठ यंदा कडाक्याची थंडी पडली आहे. सकाळी हुडहुडी भरविणारी थंडी, दुपारी उन्हाचे चटके, तर रात्री पुन्हा थंडी, असा अनुभव पुणेकर सध्या घेत आहेत. उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा गुलाबी थंडी हवीहवीशी वाटत असली, तरीही ती अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते बरं का? त्यामुळे हिवाळ्याचा आनंद लुटायचा असेल, तर तुम्हीही ‘फिट’असायला हवं!

हिवाळा हा ऋतू खरंतर आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम मानला जातो. कारण थंडीत प्रचंड भूक लागते, त्यामुळे आहारही चांगला राहतो. तंदुरुस्त राहण्यासाठीचा हा ऋतू. परंतु, थंडीत विषाणूजन्य आजार होण्याची शक्‍यताही असते. शहरात वाढलेली धूळ आणि हवेतील प्रदूषण नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे साधारणपणे दिवाळीनंतर सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंग दुखणे अशा तक्रारी डोके वर काढतात.

थंडीत ताप येणे, श्‍वसनविकार, दमा, कोरडा खोकला अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होते. शीतपेये, शीतपाणी किंवा वातानुकूलित यंत्रणेमुळे काहींना ॲलर्जीदेखील होऊ शकते.

तज्ज्ञ सांगतात...

थंडीच्या लाटेचा फटका नागरिकांना बसू शकतो. परंतु, पुण्यात तीव्र अशी थंडीची लाट येत नाही, त्यामुळे नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नाही. हवामानातील बदलांमुळे या दिवसांत शीतपेय, शीतपाणी, वातानुकूलित यंत्रणा यामुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. हवेतील प्रदूषणामुळे घसा दुखणे, याबरोबरच अन्य श्‍वसनाचे आजार उद्‌भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी थंडीत घराबाहेर पडताना गरम कपडे वापरावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

ही काळजी घ्यावी?

थंडीत पौष्टिक आहार हवा त्याचबरोबरच फलाहार, सुकामेवा हे उपयुक्त ठरेल.  नियमित व्यायाम, वॉर्निंग वॉक निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.  शीतपेय, शिळे पदार्थ, उघड्यावरचे खाणे टाळावे. या काळात शरीरातील जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने भूक लागते.  रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा आहार सेवन करा.

काही टिप्स :

  • या ऋतूत भाज्या आणि फळे भरपूर प्रमाणात खावीत. फळे आणि भाज्यांमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे हिवाळ्यात आजारांशी लढण्यासाठी प्रभावी ठरतात.

  • तीव्र हिवाळ्यात शरीराला नैसर्गिक उष्णतेची गरज असते. म्हणून शेंगदाणे, गूळ, खजूर इत्यादी शरीरातील उष्णता टिकवून ठेवणारे पदार्थ खा.

  • विवाह आणि इतर कार्यक्रमात अन्न खाताना, अन्न गरम आणि ताजे असेल याची काळजी घ्या. अति थंड झालेल्या कोणत्याही गोष्टीचे सेवन करणे टाळावे.

  • थंडीत रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवावे. हिवाळ्यात मिठाचे सेवन कमी प्रमाणात करावे. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो.

हिवाळा तसा आरोग्यदायी ऋतू आहे. मात्र, थंडी, धुक्यामुळे लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे विकार बाळावण्याची शक्यता जास्त असते. उबदार कपड्यांच्या वापराबरोबर प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढवायला हवे.

- डॉ.संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

थंडीच्या काळात सर्दी आणि तापाचे रुग्ण वाढू शकतात. या काळात उबदार कापड्यांबरोबरच आहारात पालेभाज्यांचा वापर वाढवावा.

- डॉ. नागनाथ एमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT