Weightloss Journey esakal
आरोग्य

Weightloss Journey : ना डाएट, ना जीम तरीही 10 महिन्यात केलं ५२ किलो वजन कमी...

वजन कमी करायचं म्हणजे स्ट्रिक्ट डाएट आणि जीम हवंच असं अनेकांना वाटतं.

धनश्री भावसार-बगाडे

Pratima Lokwani Weight Loss Jurney : वजन कमी करायचं म्हणजे स्ट्रिक्ट डाएट आणि जीम हवंच असं अनेकांना वाटतं. पण तेच जमत नसल्याने आमचं वजन कंट्रोल होत नाही अशी अनेकांची सबब असते. पण मध्यप्रदेशच्या भोपाळमधील प्रतिमा लोकवानी यांनी सिद्ध केलं आहे की, स्ट्रिक्ट डाएट आणि जीम शिवायपण वजन कमी करता येतं.

लाइफस्टाईलमध्ये काही थोडेफार बदल केल्याने देखील तुम्ही सहज वजन करू शकतात हेच दाखवणारं हे उदाहरण आहे.

आज तकच्या वृत्तानुसार प्रतिमा लोकवानी यांनी सांगितलं की, त्यांनी १० महिन्यांमध्ये ५२ किलो वजन कमी केलं. आणि आता त्यांचं वजन ६० किलोच्या आसपासच राहते. कशी होती त्यांची ही फिटनेस जर्नी जाणून घेऊया.

त्या म्हणाल्या की, 'मी लहानपणापासूनच फार जाड होते. मला खाण्यापिण्याची फार आवड होती. मी रोज पिझ्झा, बर्गर आणि जंक फूड खात असे. त्यामुळे माझं वजन सतत वाढत होतं.'

त्या शाळेत असतानाही त्यांचं वजन भरपूर होतं. त्यावरून लोक त्यांना फार चिडवत. शिवाय वजन वाढल्यामुळे त्यांना बऱ्याच शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. जसं, गुडघे दुखी, श्वास वाढणं, स्टॅमिना कमी होणं, थकवा जाणवणं, पीसीओएस आणि थायरॉइड असे अनेक त्रास त्यांना होऊ लागले. त्यामुळे मासिक पाळी अनियमित झाली आणि १ वर्ष पाळीच आली नाही.

मग त्यांनी वजन कमी करणं फार मनावर घेतलं. पण यासाठी त्यांनी जीम जॉइन केली नाही की, स्ट्रिक्ट डाएटींगही केली नाही. त्यांनी फक्त खाण्याच्या प्रमाणात बदल केला आणि त्यांना परिणाम दिसू लागले. १० महिन्यांमध्ये ५२ किलो वजन कमी केलं.

डाएटमध्ये फॉलो केल्या फक्त या गोष्टी

  • वजन कमी करण्यासाठी घरचं जेवण जेवल्या.

  • त्यातही कॅलरीज आणि क्वांटिटी कधीही काऊंट केली नाही. पण खाणं प्रमाणात ठेवलं.

  • बाहेरचं खाणं, जंक फूड खाणं बंद केलं.

  • आहाराच फायबर आणि प्रोटीनसोर्स वाढवला.

  • त्यांच्या आवडीचे पदार्थ पिझ्झा, आइस्क्रिम, पॅन केक, पाणीपुरी अशा त्यांच्या आवडीचे पदार्थही त्यांनी खाल्ले.

  • त्या नाश्त्यात ब्रेड ऑम्लेट, दुपारच्या जेवणात भाजी, चपाती आणि वरण भात खात.

  • संध्याकाळी थोडा मखाना आणि ड्रायफ्रूट्स.

  • रात्रीच्या जेवणात भाजी, चपाती खात.

वजन मेंटेन करण्यासाठी

  • प्रतिमा सांगतात त्यांनी वजन कमी करताना जीम जॉइन केलं नव्हतं, व्यायामही केला नाही. त्याशिवायच ५२ किलो वजन कमी केलं.

  • पण आता हे कमी वजन मेंटेन रहावं म्हणून त्या नियमित व्यायाम करतात. त्यांनी जीम सुरू केली आहे.

  • मसल्स मास वाढवण्यासाठी याची आवश्यकता आहे.

  • त्या आता आठवड्यातून ६ दिवस व्यायाम करतात. आणि ही जीम त्यांच्या घरापासून २० किलोमीटर लांब आहे.

व्यायाम

  • व्यायामात त्या वेट ट्रेनिंग, हाय इंटेंसिटी एक्सरसाइज, कार्डिओ इत्यादी व्यायाम प्रकार करतात.

  • त्यांना वेट लिफ्टींगपण करायला आवडतं. त्यांचा वेट ट्रेनिंवर फार फोकस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT