New Weightloss Medicine Launched in India sakal
आरोग्य

Weight Loss Medicine in India: भारतात आलं वजन घटवण्याचं नवं औषध! जाणून घ्या किंमत, वापर आणि फायदे एकाच क्लिकवर

How Does Wegovy Medicine Work for Obesity: भारतात लठ्ठपणावर उपाय म्हणून 'वेगोवी' हे वजन कमी करणारे इंजेक्शन सादर; किंमत, डोस आणि फायदे जाणून घ्या

Anushka Tapshalkar

Weight loss injection Wegovy launched in India: भारतात लठ्ठपणा ही समस्या झपाट्याने वाढत असून, त्यामुळे अनेक लोकांचे दैनंदिन आयुष्य आणि आरोग्य दोन्ही प्रभावित होत आहेत. वाढलेले वजन हे केवळ शारीरिक सौंदर्यावर परिणाम करणारे नसून, त्याचे दुरगामी परिणाम शरीराच्या अनेक अवयवांवर होतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कोलेस्टेरॉल आणि सांधेदुखी यांसारख्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. अनेक जण डाएट, व्यायाम आणि नैसर्गिक उपाय करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु काही प्रकरणांमध्ये हे उपाय अपुरे ठरतात.

अशा लोकांसाठी औषधांच्या माध्यमातून मदत मिळू शकते. ही गरज लक्षात घेऊन डेनमार्कमधील नोवो नॉर्डिस्क (Novo Nordisk) कंपनीने ‘वेगोवी’ (Wegovy) हे वजन नियंत्रणासाठीचं औषध भारतात सादर केलं आहे. वैज्ञानिक पद्धतीने विकसित हे औषध जागतिक स्तरावर यशस्वी ठरले असून, आता भारतीय रुग्णांसाठीही एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

भारतातील लठ्ठपणाचं वास्तव

INDIAB या संशोधनानुसार, भारतात सुमारे २५ कोटी लोक सामान्य लठ्ठपणाने त्रस्त आहेत, तर ३५ कोटींहून अधिक जणांना पोटाभोवती चरबी साचल्यामुळे निर्माण होणाऱ्या लठ्ठपणाचा सामना करावा लागतो.

‘वेगोवी’सारखं औषध लठ्ठपणावर एक पर्याय ठरू शकतं, पण त्याचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा, असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे.

‘वेगोवी’ म्हणजे नेमकं काय?

वेगोवी हे इंजेक्शन स्वरूपात वापरलं जाणारं औषध असून त्यामध्ये ‘सेमाग्लूटाइड’ (Semaglutide) नावाचा घटक असतो. हे जीएलपी-1 रिसेप्टर अ‍ॅगोनिस्ट (GLP-1 RA) प्रकारातील असून आठवड्यातून एकदाच वापरायचं असतं. वजन कमी करण्यास मदत करतानाच, हृदयविकाराचा धोका कमी करण्यातही हे औषध उपयुक्त आहे असं सांगण्यात आलं आहे. हे वापरण्यास सोपं असलेलं पेनसारखं उपकरण आहे.

हे औषध शरीरावर कसा परिणाम करतं?

या औषधातील घटक GLP-1 हार्मोनप्रमाणे कार्य करतो, ज्यामुळे भूक कमी होते आणि वारंवार खाण्याची इच्छा देखील आटोक्यात येते. यामुळे शरीरात कमी कॅलरीज जातात आणि वजन हळूहळू कमी होऊ लागतं. शिवाय, इन्सुलिन प्रतिकारक्षमतेत सुधारणा होते आणि हृदय व मेटाबोलिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.

कोणकोणते डोस उपलब्ध आहेत?

वेगोवी पाच वेगवेगळ्या डोसमध्ये उपलब्ध आहे:

  • 0.25 मिग्रॅ

  • 0.5 मिग्रॅ

  • 1 मिग्रॅ

  • 1.7 मिग्रॅ

  • 2.4 मिग्रॅ

किंमत

  • 0.25mg, 0.5mg आणि 1mg डोससाठी किंमत: ₹17,345 प्रति पेन

  • 1.7mg साठी: ₹24,280 प्रति पेन

  • 2.4mg साठी: ₹26,015 प्रति पेन

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : तरुणांना १५ हजार रुपये मिळणार....पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा...काय आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना?

Independence Day: दिवाळीत मोदी देशाला देणार मोठे गिफ्ट, GST बद्दल केली मोठी घोषणा, करात मिळणार दिलासा

PM Narendra Modi Speech Live Update : राष्ट्रीय सुरक्षा कवच २०३५ पर्यंत आणखी मजबूत करणार- पंतप्रधान मोदी

Independence Day 2025 PM Modi : अणुधमक्यांना घाबरणार नाही, ब्लॅकमेल केलं तर...; मोदींचा लाल किल्ल्यावरून असीम मुनीरला इशारा!

Independence Day 2025 : आता मेड इन इंडिया 'सेमीकंडक्टर' चिप बाजारात येणार, पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन 'आत्मनिर्भर'ची गर्जना

SCROLL FOR NEXT