Exercises For Belly Fat Sakal
आरोग्य

Belly Fat Loss तिशीनंतर पोटावरची चरबी वाढतेय? नियमित करा 3 व्यायाम, शरीर होईल सडपातळ

Exercises For Belly Fat : धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे हल्ली बहुतांश जण लठ्ठपणाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. वाढत्या वयासोबतच तुमच्या पोट व कमरेवर अतिरिक्त चरबी जमा झाली आहे का? तर मग यावर वेळीच करा उपाय.

सकाळ डिजिटल टीम

Exercises For Belly Fat : वयाच्या तिशीनंतर आपल्या शरीराचे स्नायू कमकुवत होऊ लागतात, यामुळे शरीराची ताकद देखील कमी होऊ शकते. परिणामी शरीराच्या मध्यभागी म्हणजेच कंबर, पोटावर अतिरिक्त चरबी वाढू लागते,  अशी माहिती एका संशोधनामध्ये आढळून आली आहे.  

धकाधकीचे लाइफस्टाइल, घर तसंच ऑफिसच्या कामाची जबाबदारी यामुळे अनेकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. पण लठ्ठपणाची समस्या दूर करायची असेल तर आजपासून आपल्या वर्कआउट रूटीनमध्ये या तीन व्यायामांचा समावेश करावा. 

यामुळे तुमच्या पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल. महिलावर्गासाठी हे व्यायामप्रकार खूपच फायदेशीर ठरू शकतात. 

पोटावरील चरबी दूर करण्यासाठी फ्लोअर एक्सरसाइज

झेड प्रेस

झेड प्रेस हा एक फ्लोअर एक्सरसाइज आहे, ज्यामुळे तुमच्या पोटाचे, खांद्याचे, पाठीचे स्नायू मजबूत होण्यास मदत मिळू शकते. हा व्यायाम करण्यासाठी जमिनीवर बसा, दोन्ही पाय समोरील बाजूस सोडा व पाठ-मान ताठ ठेवा.

आता दोन्ही हातांमध्ये डंबल घ्या आणि हात वरील बाजूस  न्यावे. आता दोन्ही हात सरळ करा आणि हळूहळू हातातील डंबल खांद्यापर्यंत आणा. हा व्यायाम दहा वेळा करावा.  

सुपरमॅन (Superman)

योग मॅटवर पोटाच्या बाजूने झोपावे. आता दीर्घ श्वास घ्या आणि दोन्ही पाय, हात, छातीचा भाग, मांड्या वरील बाजूने उचला आणि होल्ड करा. आता हळूहळू आपले हात, पाय आणि हनुवटी जमिनीवर ठेवा व रिलॅक्स व्हा. हा व्यायाम आपण आपल्या क्षमतेनुसार करावा. 

पुशअप (Pushup)

पुश-अप हा एक पारंपरिक व्यायाम आहे, ज्याच्या सरावाने तुमच्या पोटाचे, छातीचे आणि खांद्यांचे स्नायू मजबूत होऊ शकतात. प्लँक पोझिशनमध्ये या व पाठ- कंबर कुठेही न वाकवता आपले कमरेपासून वरील शरीर लयबद्ध पद्धतीने खाली-वर करावे.

हा व्यायाम देखील आपण आपल्या क्षमतेनुसार करावा. महत्त्वाचे म्हणजे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हा व्यायाम करावा.  अन्यथा शारीरिक दुखापत होण्याची शक्यता असते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!

SWAYAM Exam 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SWAYAM जानेवारी 2026 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या परीक्षा कधी होणार

Gold Rate Today : सोनं-चांदी सुसाट! जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे MCX बाजारात सोनं २ हजारांनी महागलं; मकर संक्रांतीला भाव कमी होणार?

ट्रम्प व्हेनेझुएलाचे काळजीवाहू राष्ट्रपती, स्वत:च शेअर केला फोटो; काय म्हणाले?

IND vs NZ 1st ODI : भारताला मोठा धक्का! रिषभ पंतनंतर आणखीन एका सुपरस्टारची मालिकेतून माघार; वर्ल्ड कपपूर्वी वाढली चिंता

SCROLL FOR NEXT