Cozy Cardio Benefits Sakal
आरोग्य

Cozy Cardio फिटनेसप्रेमींमध्ये वेटलॉससाठी वाढतोय कोझी कार्डियोचा ट्रेंड, जाणून घ्या काय-काय आहेत फायदे

लठ्ठपणाच्या समस्येमुळे अनेक आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. या समस्या टाळण्यासाठी कोणकोणते व्यायाम करावेत, जाणून घेऊया सविस्तर…

Harshada Shirsekar

घरातील तसेच ऑफिसमधील कामांमुळे अनेकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी हळूहळू शारीरिक तसेच मानसिक समस्या वाढू लागतात. काही जणांचे वजन देखील वाढते. लठ्ठपणामुळे मधुमेह व उच्च रक्तदाब यासारख्या आजारांना आयते निमंत्रण मिळते. 

दुसरी गंभीर समस्या म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानं हृदयाच्या आरोग्यासही धोका निर्माण होतो. या समस्यांपासून आरोग्याचे संरक्षण करावयाचे असेल तर सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या व्यायामाचा आपण आपल्या वर्कआऊट रूटीनमध्ये समावेश करू शकता. कोझी कार्डिओ (Cozy Cardio Benefits In Marathi) या व्यायाम प्रकाराने सध्या फिटनेसप्रेमींना वेड लावलंय. जाणून घेऊया यामुळे आरोग्यास मिळणारे फायदे...

कोझी कार्डियो म्हणजे नेमके काय? ( What is cozy cardio in Marathi)

टिकटॉक अ‍ॅपवर सध्या कोझी कार्डिओ (Cozy Cardio Exercises) हा एक्सरसाइझ प्रकार खूप ट्रेंडमध्ये आहे. या व्यायाम प्रकारात तुलनेने कमी प्रभावी कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइजचा समावेश केला जातो. उदाहरणार्थ अतिशय संथ गतीने उड्या मारणे - धावण्याचा व्यायाम केला जातो. 

अशा प्रकारच्या व्यायामसाठी जास्त ताकदीची आवश्यकता नसते. विशेष म्हणजे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हा व्यायाम केल्यास शरीराचे वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. दुसरा फायदा म्हणजे यासाठी तुम्हाला जिममध्येही जाण्याची आवश्यकता नाही.  

आरोग्यास कोणकोणते लाभ मिळू शकतात?

हृदय विकार, स्ट्रोक, मधुमेह आणि कॅन्सर यासारख्या रोगांचा धोका कमी होण्यास मदत मिळते. तसेच मेंदूच्या आरोग्यासाठीही हा व्यायाम महत्त्वपूर्ण मानला जातो. पण हा व्यायाम करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे फार महत्त्वाचे आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SC Rejected Walmik Karad Bail : सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मीक कराडला सुप्रीम कोर्टाचा दणका

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता, सोमय्या दाम्पत्याला दणका

Daily Puja Tips: रोज देवपूजेत कोणते साहित्य पुन्हा वापरावे, कोणते टाळावे? जाणून घ्या नियम

Kolhapur Gokul Dudh Sangh Election: आमदारकी नको पण गोकुळ संचालक द्या! कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणूक रणधुमाळीचा अखेर मुहूर्त ठरला

Pune Crime: शिक्रापुरात कोयता गॅंगच्या नावाने दहशत; तळेगाव रस्त्यावर दुकानदाराला जबर मारहाण, १२ जणांवर गुन्हा!

SCROLL FOR NEXT