Rice Effect On Body esakal
आरोग्य

Rice Effect On Body : तुम्ही भात खाल्लाच नाही तर शरीरावर काय परिणाम होतील? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

जेवणासाठी भातावर अवलंबून राहाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही

साक्षी राऊत

Rice Effect On Body : तांदूळ हा दक्षिण आशियातील लोकांचा मुख्य आहार आहे. भारतात लोक भाताशिवाय त्यांचा आहार अपूर्ण मानतात. दिवसातून किमान एकदा तरी लोक मुख्य जेवण म्हणून थोड्या प्रमाणात तरी भात नक्कीच घेतात. मात्र जेवणासाठी भातावर अवलंबून राहाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही.

भातामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त असते आणि इतर प्रकारच्या पोषक तत्वांचा त्यात अभाव असतो. यासोबतच त्यात भरपूर स्टार्चही आढळतो. जर आपण शुद्ध तांदूळ जास्त वापरला तर रक्तातील साखरेची पातळी वाढते.

भाताचे अधिक सेवन केल्यास त्याचा परिणाम तुमच्या वजनावरही होतो. समजा एखाद्या व्यक्तीने महिनाभर भात खाल्लाच नाही तर त्याच्या आरोग्यावर त्याचे काय परिणाम होतील जाणून घेऊया.

तुम्ही महिनाभर भात खाल्लाच नाही तर?

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीबालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या मुख्य पोषण विशेषज्ञ, प्रिया भ्रमा यांनी सांगितले की, जर तुम्ही महिनाभर भात खाल्ला नाही तर शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होईल, यामुळे प्रामुख्याने वजन कमी होऊ शकते.

तांदळात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने जेव्हा आपण भात खात नाही तेव्हा शरीरात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी होते. साहजिकच यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर होईल. वोकार्ड हॉस्पिटलच्या ज्येष्ठ आहारतज्ज्ञ रिया देसाई यांनी सांगितले की, महिनाभर भात न खाल्ल्यास वजन कमी होऊ शकते, पण भाताऐवजी इतर तत्सम पदार्थ खाणेही तुम्हाला टाळावे लागेल. (Health)

शरीरात अचानक साखरेची पातळी वाढणार नाही

जर तुम्ही इतर कोणतेही धान्य जसे की तांदूळ ज्यात कार्बोहायड्रेट जास्त असेल ते खाल्ले तर तुमचे वजन कमी होणार नाही. रिया देसाईने सांगितले की, भातामुळे अचानक वाढणारी शुगर लेव्हल नियंत्रणात राहील.

मात्र भात खाणे तुम्ही काही काळासाठीच बंद केले आणि काही काळानंतर तुम्ही परत भात खाणे सुरु केले तर तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. तेव्हा आहारात भाताचे प्रमाणात नियंत्रित ठेवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT