Key Hole Surgery Esakal
आरोग्य

Key Hole Surgery: मेंदूशी संबंधीत की होल सर्जरी म्हणजे काय? कीहोल सर्जरीनंतर कोणती काळजी घ्यावी

Brain Surgery: मेंदूशी संबंधित प्रत्येक शस्त्रक्रिया ही फारच नाजुक असते, पण कमीत कमी कापाकापी असलेली मेंदूची शस्त्रक्रिया त्या रुग्णामध्ये आणखी काही गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता कमी करते.

सकाळ वृत्तसेवा

कीहोल सर्जरी नावाने ओळखली जाणारी, कमीत कमी कापाकापी असलेली मेंदूची शस्त्रक्रिया म्हणजे एक अशी प्रक्रिया आहे, जिचा उद्देश असतो मेंदूमधील गाठी सुरक्षित आणि नेमकेपणाने काढणे आणि समस्या दूर करणे.

ओपन ब्रेन सर्जरीच्या तुलनेत ही शस्त्रक्रिया करताना मेंदूच्या आजूबाजूच्या भागाला कमी धक्का लागतो. यातील बऱ्याचशा शस्त्रक्रिया काही विशिष्ट उपकरणांच्या मदतीने करता येतात किंवा स्मॉल क्रॅनीटॉमी प्रकार अवलंबिला जातो, ज्यात कवटीच्या हाडाचा, तोंडाचा किंवा नाकपुडीचा एक भाग उघडला जातो.

मेंदूशी संबंधित प्रत्येक शस्त्रक्रिया ही फारच नाजुक असते, पण कमीत कमी कापाकापी असलेली मेंदूची शस्त्रक्रिया त्या रुग्णामध्ये आणखी काही गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता कमी करते.

कमीत कमी कापाकापी असलेली मेंदूची शस्त्रक्रिया केल्यानंतर काय करावे आणि काय करू नये, याबाबत न्यूरोसर्जन डॉ. अमित धाकोजी यांनी माहिती दिली आहे.

हे करावे

  1. झोपेचे वेळापत्रक नक्की करा: शस्त्रक्रियेनंतर चांगली झोप घेणे हे अत्यावश्यक असते, कारण जेव्हा आपण झोपतो, तेव्हा मेंदू झोपत नाही. त्यावेळी तो सक्रिय असतो आणि रिकव्हरी मोडमध्ये जातो. त्यामुळे जर तुम्ही योग्य झोप घेतली नाहीत, तर बरे होण्यावर विपरीत परिणाम होतो (रिकव्हरी प्रक्रिया प्रभावित होते).

  2. थोडी-थोडी शारीरिक हालचाल करा: थोडा हलका-फुलका व्यायाम करण्याचा तसेच थोड्या वजनदार वस्तू हलवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा मेंदू तुमच्या हालचालींबाबत सतत जागरूक राहतो. आणि त्यामुळे मेंदू आणि तुमचे शरीर यांच्यात चांगला समन्वय निर्माण होण्यास मदत होते.

  3. मनाला व शरीराला आराम देणारी दिनचर्या अंगिकारा: कोमट पाण्याने स्नान करणे, वाचन आणि योग करणे यासारख्या गोष्टी आपल्या दैनिक वेळापत्रकात समाविष्ट करा कारण त्यामुळे तुमच्या मेंदूला आराम मिळेल.

  4. आपल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या संपर्कात रहा: मेंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही निकडीच्या प्रसंगी तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतील.

हे करू नये

  1. मादक पदार्थांचे सेवन करू नका: मेंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर कॅफीन, तंबाखू किंवा मद्य यासारख्या कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन करणे तुम्ही टाळले पाहिजे. आपल्या आहारात फळे, भाज्या आणि कडधान्ये यांचा समावेश करा कारण त्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते.

  2. तुमचा स्क्रीन टाइम कमी करा: तुमची शस्त्रक्रिया झाल्यानंतर फोन, टॅब्लेट आणि पीसीचा वापर करण्याचे टाळा कारण त्यांच्या वापरामुळे तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि तुमच्या मेंदूवर ताण पडतो.

  3. कमरेतून वाकू नका: शस्त्रक्रिया झाल्यानंतर कमरेतून वाकू नये, कारण तसे केल्याने डोक्यावर दबाव येतो. म्हणून, पाठ ताठ ठेवा आणि गुडघ्यातून वाका.

  4. प्रवास करू नका: अधिक उंचीवर असलेल्या ठिकाणी प्रवास करण्याचे टाळा. कारण अशा ठिकाणी गेल्याने तुमच्या मेंदूतील ऑक्सीजनच्या पातळीवर परिणाम होतो आणि शस्त्रक्रियेमधून बरे होणे कठीण होऊन बसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT