Yogurt and Curd Difference Sakal
आरोग्य

Yogurt and Curd Difference दही व योगर्टमध्ये नेमका काय आहे फरक? शरीरासाठी कोणता पर्याय आहे पोषक

Yogurt and Curd Difference ही आणि योगर्ट हे खाद्यपदार्थ दुधापासूनच तयार केले जातात. पण या खाद्यपदार्थांची रेसिपी वेगवेगळी असते.

सकाळ डिजिटल टीम

शरीरास प्रोबायोटिक्स पुरवठा व्हावा, यासाठी डाएटमध्ये दही आणि योगर्टचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो. कारण हे दोन्ही पदार्थ आरोग्यास पोषक मानले जातात. दही व योगर्ट म्हणजे एकच पदार्थ, असा बहुतांश लोकांचा समज असतो.

कारण दोन्ही पदार्थ दिसायला मलईदार असतात. पण खरंतर हे दोन्ही पदार्थ एकसारखे नाहीत, मंडळींनो. या दोन्ही पदार्थांचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहे. योगर्ट आणि दही दोन्ही खाद्यपदार्थ दुधापासूनच तयार केले जातात. मात्र दोन्ही पदार्थ तयार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे.

योगर्ट आणि दही तयार करण्यासाठी उपयुक्त असलेल्या बॅक्टेरिअल स्ट्रेन्समुळे या पदार्थांच्या घनता व टेक्श्चरमध्ये फरक दिसून येतो. योगर्ट पदार्थ तयार होण्यासाठी त्यास अधिक प्रमाणात कंट्रोल्ड फर्मेंटेशन प्रोसेसमधून जावे लागते. यामुळे योगर्ट कस्टर्डसारखे दिसते आणि याची चव देखील आंबट असते.

योगर्ट व दही दोन्ही आरोग्यासाठी आहेत फायदेशीर 

योगर्ट आणि दही हे दोन्ही प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि प्रोटीनचे चांगले स्रोत मानले जातात. या दोन्ही पदार्थांची फर्मेंटेशन प्रोसेस भिन्न असते. यामुळे या पदार्थामध्ये आढळणारे पोषकघटक देखील भिन्न-भिन्न असते. योगर्टमध्ये दह्याच्या तुलनेत प्रोबायोटिक्सचे प्रमाण जास्त असते. यामुळेच योगर्ट आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असे तज्ज्ञांचं मत आहे.

प्रोबायोटिक्सचे  फायदे

प्रोबायोटिक्स म्हणजे जीवंत सूक्ष्मजीवच असते,  जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अतिशय फायदेशीर असते. योगर्ट आणि दही हे दोन्ही पदार्थ प्रोबायोटिक्सचे चांगले स्रोत आहेत. प्रोबायोटिक्समुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते, पचनप्रक्रिया देखील सुधारते. 

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात व योग्य वेळी योगर्ट व दह्याचा आहारात समावेश करावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT