Smiling Depression: Sakal
आरोग्य

Smiling Depression: तुम्हीही हसून दुःख अन् तणाव लपवता का? जाणून घ्या स्मायलिंग डिप्रेशनचे लक्षण अन् उपाय

Smiling Depression: जेव्हा एखादी व्यक्ती तणावामध्ये किंवा दुःखी असूनही आनंदी राहत असेल तर त्याला स्माइलिंग डिप्रेशन म्हणतात.

पुजा बोनकिले

Smiling Depression: अनेक लोक नेहमी आनंदी आणि हसताना दिसतात. पण खरंच ते एवढे आनंदी असतात का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच यापैकी असे अनेक लोक आहेत जे हसतमुख चेहऱ्यामागे आपले आंतरिक दुःख आणि तणाव लपवत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती तणावामध्ये किंवा दुःखी असूनही आनंदी राहत असेल तर त्याला स्मायलिंग डिप्रेशन म्हणतात. स्मायलिंग डिप्रेशनचे लक्षण कोणते आणि उपाय कोणते हे जाणून घेऊया.

स्मायलिंग डिप्रेशन म्हणजे काय?

सर्व लोकांचे नैराश्याचे कारण वेगवेगळे असतात. खरं तर काही लोकांना हे देखील माहिती नसते की ते नैराश्याचा सामना करत आहेत. हेल्थलाइनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार , हसत-खेळत उदासीनता देखील अशाच प्रकारचे नैराश्य आहे, ज्यामध्ये व्यक्ती बाहेरून आनंदी दिसतो. पण प्रत्यक्षात तो व्यक्ती आतून तणावात किंवा निराश असतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती आनंदी राहून तणाव लपवत असेल तेव्हा त्याला स्मायलिंग डिप्रेशन म्हणतात. ही एक व्यापकपणे ओळखली जाणारी वैद्यकीय स्थिती नाही, म्हणून त्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

लक्षण कोणते आहेत?

स्मायलिंग डिप्रेशनचे लक्षणे ओळखणे खूप कठीण असते, परंतु दीर्घकाळापर्यंत दुःख हे नैराश्याचे सर्वात प्रमुख लक्षण आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रत्येकाला नैराश्याचा अनुभव वेगवेगळ्या प्रकारे येतो आणि त्याची लक्षणे वेगवेगळी असू शकतात.

  • सुस्त किंवा थकल्यासारखे वाटणे

  • निद्रानाश

  • वजन आणि भूकमध्ये बदल होणे

  • अस्वस्थ वाटणे

  • कोणताही गोष्ट न करण्याची इच्छा नसणे

उपचार

स्मायलिंग डिप्रेशनची समस्या दूर करण्यासाठी सर्वात आधी मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्यावी. त्यासोबतच औषध आणि योग्य आहार नैराश्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधण्याची गरज आहे, ज्यामुळे या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांना खूप मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

Lonar Lake Development: पर्यटकांना मिळणार लोणार सरोवराची वैज्ञानिक व ऐतिहासिक माहिती

Ichalkaranji : मला जगायचं नाही सोडा, महिला जीवनाला कंटाळून इचलकरंजी घाटावर गेली अन्...

Fake Currency: धाड परिसरात बनावट नोटा चलनात; पोलिस व बँक प्रशासनाकडून आवाहनः व्यापारी व नागरिकांन सतर्क राहावे

SCROLL FOR NEXT