Vitamin B-12 Deficiency esakal
आरोग्य

Vitamin B-12 Deficiency : व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता म्हणजे नेमकी भानगड काय?

आजकालच्या खराब अन्नामुळे शरीराला जीवनसत्त्वे नक्कीच मिळत नाहीत. यामुळे व्हिटॅमिनची कमतरता निर्माण होते

सकाळ ऑनलाईन टीम

Vitamin B-12 Deficiency : शरीराच्या चांगल्या कार्यासाठी दररोज अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आवश्यक असतात, परंतु आजकालच्या खराब अन्नामुळे शरीराला जीवनसत्त्वे नक्कीच मिळत नाहीत. यामुळे व्हिटॅमिनची कमतरता निर्माण होते. यामध्ये व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची अधिक प्रकरणे पाहिली जात आहेत.

डॉक्टरांच्या मते, व्हिटॅमिन बी १२ चे काम लाल रक्तपेशी बनवणे आणि मज्जासंस्था चांगली ठेवणे हे आहे. त्याची कमतरता मेंदूच्या कार्यावरही परिणाम करू शकते. अशा परिस्थितीत या जीवनसत्त्वाची कमतरता हलक्यात घेऊ नये.

कमतरतेने काय होऊ शकते ?

डॉक्टरांच्या मते, व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, न्यूरोलॉजिकल समस्या, त्वचा पिवळी पडणे, वजन कमी होणे आणि हृदय गती वाढणे यासारख्या समस्या उद्‍भवू शकतात. शरीरात या जीवनसत्त्वाची सतत कमतरता राहिल्यास डोकेदुखी, कोणत्याही कामात लक्ष न लागणे, तोंडाला फोड येणे अशा समस्या उद्‍भवू शकतात.

किती जीवनसत्वाची दररोज आवश्‍यकता ?

प्रौढ व्यक्तीला दररोज २.४ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी १२ आवश्यक असते. एवढ्या प्रमाणात जीवनसत्व उपलब्ध नसेल, तर त्याची कमतरता शरीरात सुरू होते. हे ओळखण्यासाठी, व्हिटॅमिन बी १२ ची नियमित तपासणी करा. जर ते कमी होत असेल तर आहाराकडे लक्ष द्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर काही औषध घेण्याचा सल्ला देऊ शकतात किंवा व्हिटॅमिन बी १२ इंट्रामस्क्युलर इंजेक्शन घेण्याचा सल्ला देऊ शकता.

आहारात बदल करावा

याशिवाय काही पदार्थांचा आहारात समावेश करूनही या जीवनसत्त्वाची कमतरता टाळता येते. शरीरातील व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही बदाम, दूध, दही, मासे, अंडी किंवा लाल मांस यांसारख्या आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश करू शकता. या पदार्थांव्यतिरिक्त आपल्या आहारात हिरव्या आणि पालेभाज्यांचा समावेश करा. तसेच दिवसभर योग्य प्रमाणात पाणी प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT