Heart Health google
आरोग्य

Heart Health : निरोगी हृदयासाठी कसा असावा आहार ?

हृदयविकार असलेल्या लोकांसाठी सोडियमचे सेवन हे दररोज २ हजार मिलीग्रामपेक्षा कमी असावे.

नमिता धुरी

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बदलत्या जीवनशैलीबरोबच आहाराच्या सवयी देखील बदलल्या आहेत. आहाराच्या चुकीच्या सवयी हृदयाच्या आरोग्यास घातक ठरत असून आपल्या रोजच्या आहारात काय बदल करावेत हे सांगत आहेत मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ ब्रजेश कुमार कुंवर.

आहारातील मीठाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा

उच्च सोडियमयुक्त आहारामुळे रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो. हार्ट फेल्युअर असलेल्या लोकांनी सोडियमचे प्रमाण कमी असलेला आहार घ्यावा. हृदयविकार असलेल्या लोकांसाठी सोडियमचे सेवन हे दररोज २ हजार मिलीग्रामपेक्षा कमी असावे. हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

आहारातील सोडियमचा वापर मर्यादित करण्यासाठी खास टिप्स :

· हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थ उदा.- फ्रोजन फुड, मीट, हवाबंद डब्यातील सूप, रेडी टु कुक पास्ता, सॅलड ड्रेसिंग इतर मसाल्यांचे सेवन मर्यादित करा.

· प्री-पॅकेज केलेले किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खरेदी करताना, पोषण लेबले वाचण्याची खात्री करा. शक्य असल्यास लो सोडियमयुक्त खाद्यपदार्थांची निवड करा.

· स्वयंपाक करताना मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा. चवीसाठी लिंबूचा रस, मसाले, औषधी वनस्पती आणि इतर सोडियमचे प्रमाण कमी असलेल्या घटकांचा वापर करा.

जेवणात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा -

यामध्ये शरीराला आवश्यक असलेले फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या आहाराचा समावेश असणे आवश्यक आहे. जास्त कॅलरीज आणि पोषणमूल्य कमी असलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित करणे योग्य ठरेल.

अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) च्या शिफारशींनुसार पोषक आहारात समावेश असलेले पदार्थ

  • बिया आणि इतर शेंगा

  • फळे आणि भाज्या

  • तृणधान्य

  • सुकामेवा आणि तेलबिया

  • चिकन (विदाऊट स्कीन)

  • सीफूड

  • लो फॅट्स असलेले दुग्धजन्य पदार्थ

मटण, मिठाई आणि ट्रान्स-फॅट, सॅच्युरेटेड फॅट, सोडियम, कोलेस्टेरॉल किंवा रिफाइंड शुगरचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळा.

मर्यादेपेक्षा जास्त द्रव पदार्थांचे सेवन टाळा. हार्ट फेल्युअर असलेल्या लोकांमध्ये, जास्त प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन हे रक्तदाब वाढीचे कारण ठरु शकते आणि त्यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो.

दररोज किती पाणी प्यावे याचा सल्ला डॉक्टरांकडून घ्यावा. लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ किंवा औषधं जी शरीराला अतिरिक्त द्रव काढून टाकण्यास मदत करतात त्यांचा वापर हृदयरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा.

मद्यपानाचे व्यसन टाळा

मद्यपानाचे व्यसन टाळल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यांचे संरक्षण करण्यास मदत होईल. अति मद्यपानाने स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका तसेच इतर आजारांचा धोका वाढू शकतो.

वजन कमी करा

तुमच्या हृदयावरील ताण कमी करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला वजन कमी करण्याचा सल्ला देतात. वजन कमी करण्यासाठी आहारात नेहमीपेक्षा कमी कॅलरीजच् सेवन आवश्यक आहे. त्यामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी करा आणि पोषक तत्वांनी युक्त अन्नाचे सेवन करा आणि आहारतज्ञांचा सल्ला घ्या.

हार्ट फेल्युअर असलेल्या लोकांसाठी पोषक तत्वांनी युक्त आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. हृदयविकाराच्या उपचारासाठी पौष्टिक आहाराचे सेवन केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

हार्ट फेल्युअरच्या निदानानंतर डॉक्टर मीठ, प्रक्रिया केलेले आणि हवाबंद डब्यातील पदार्थ, अल्कोहोल, फास्ट फूड आणि जंक फूडचे सेवन न करण्याचा सल्ला देतात.आहारात अचूक बदल करण्यासाठी आहारतज्ञांची मदत घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Kolhapur Accident Video : कोल्हापूरमध्ये मद्यपी ट्रॅक्टर चालकाने वृद्ध महिलेला उडवलं; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरच्या भांडेवाडी परिसरात आढळला बिबट्या, वनविभागाच्या वेगवेगळ्या रेस्क्यू सुरु

MPSC Success : संघर्ष ते यशाचे शिखर! सायकलवर भंगार गोळा करणाऱ्या वडिलांच्या कन्येची MPSC त राज्यात पहिली झेप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

SCROLL FOR NEXT