Intermittent Fasting sakal
आरोग्य

Intermittent Fasting: रात्री उपाशी पोटी झोपल्याने खरंच वजन कमी होते? जाणून घ्या या मागचे सत्य…

गेल्या काही दिवसांपासून Intermittent Fasting ची जोरदार चर्चा आहे.

Aishwarya Musale

दिवसभर घरात आणि बाहेर काम केल्यानंतर, प्रत्येकजण रात्रीच्या जेवणाची वाट पाहत असतो. यामुळे आपली भूक तर भागतेच, शिवाय शरीराला ऊर्जाही मिळते, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर तुम्ही झोपण्यापूर्वी अनेक दिवस अन्न खाल्ले नाही तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो. महिनाभर सतत रात्रीचे जेवण स्किप केल्याने काय परिणाम होतात ते जाणून घेऊया.

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय?

सध्याच्या काळात इंटरमिटेंट फास्टिंगचा ट्रेंड खूप वाढला आहे. याला फॉलो करणारे लोक 12 ते 15 तास काहीही खात नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही ३० दिवस रात्रीचे जेवण वगळून हे चॅलेंज पूर्ण करू शकता.

इंटरमिटेंट फास्टिंग करण्याचे फायदे

जर तुम्ही रात्रीचे जेवण न करता इंटरमिटेंट फास्टिंग करत असाल तर महिन्याभरात अनेक उत्कृष्ट परिणाम दिसू शकतात.

1. वजन हळूहळू कमी होईल.

2. मधुमेहाचा धोका कमी होईल.

3. हृदयविकाराचा धोका कमी असणार

4. खराब कोलेस्ट्रॉल रक्ताच्या नसांमधून नाहीसे होईल.

5. उच्च रक्तदाबाची तक्रार राहणार नाही.

6. शरीराच्या चयापचयाला चालना मिळेल.

इंटरमिटेंट फास्टिंगचे नुकसान

भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांच्या मते, इंटरमिटेंट फास्टिंग करण्याचे फायदे आहेत यात शंका नाही, परंतु प्रत्येक व्यक्तीसाठी ते परिपूर्ण असेलच असे नाही. काही लोकांना त्याचे नुकसानही सहन करावे लागेल.

  • रात्रीचे जेवण स्किप केल्याने तुमच्या मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

  • यामुळे तुम्हाला चिडचिड होऊ शकते.

  • रात्रीचे जेवण वगळल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी खूप डाउन होऊ शकते.

  • रात्रीचे जेवण स्किप केल्याने तुमचे शरीर कमकुवत होऊ शकते.

  • असे केल्याने काही लोकांना चक्कर येऊ शकते.

  • शरीरात जीवनसत्त्वे, खनिजांसह अनेक पोषक तत्वांची कमतरता असू शकते.

  • तुम्हाला आधीच आरोग्याच्या अनेक समस्या असल्यास, इंटरमिटेंट फास्टिंग करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT