कुठल्या पाण्याने आंघोळ करावी Esakal
आरोग्य

Bathing थंड पाण्याने आंघोळ करावी की गरम?  जाणून घ्या फायदे

काहीजण गरम पाण्याने आंघोळ करणं पसतं करतात तर काही गार Cold Water. गरम पाण्याने आंघोळ केल्याने थकवा दूर होतो. शरीराला आराम मिळतो. तर गार पाण्याने आंघोळ केल्याने अनेकांना फ्रेश वाटतं आणि एनर्जी येते

Kirti Wadkar

प्रत्येकजण साधारण दिवसाची सुरुवात ही आंघोळ करून करतात. आंघोळ ही आपल्या प्रत्येकाच्या दिनचर्ये अत्यंत महत्वाची अशी क्रिया आहे. आंघोळ ही केवळ शरीर स्वच्छ करण्यासाठी केली जाते असं नव्हे. Which Water useful for bathing Hot or Cold

तर नियमित आंघोळ Bathing केल्याने आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे देखील होत असतात. सकाळी गरम पाण्याने Hot Water आंघोळ केली की फ्रेश वाटतं आणि दिवसभर काम करण्यासाठीची उर्जा मिळते. तर अनेकदा रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करणंही समाधान देणारं असतं.

काहीजण गरम पाण्याने आंघोळ करणं पसतं करतात तर काही गार Cold Water. गरम पाण्याने आंघोळ केल्याने थकवा दूर होतो. शरीराला आराम मिळतो. तर गार पाण्याने आंघोळ केल्याने अनेकांना फ्रेश वाटतं आणि एनर्जी येते. अनेकदा ठराविक वेळी थंड किंवा गार पाण्याने आंघोळ करण्याचे वेगवेगळे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला गरम आणि थंड पाण्याने आंघोळ करण्याचे काय फायदे आहेत हे सांगणार आहोत. 

गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

१. चांगली झोप येण्यासाठी- SCHL हेल्द डॉट ओआरजी आणि तज्ञांच्या मते रात्री गरम पाण्याने आंघोळ केल्यास चांगली झोप लागण्यास मदत होते. दिवसभर काम केल्याने शरीर जड झालेलं असतं तसचं ते थकलेलं असतं. अशावेळी  झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ केल्यास बॉडी रिलॅक्स होते आणि चांगली झोप लागते.

२.  त्वचा उजळते- जेव्हा तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करता तेव्हा तुमच्या त्वचेवरील छिद्र खुली होतात. ज्यामुळे त्वचेतील घाण बाहेर निघण्यास मदत होते आणि त्वचा पूर्णपणे स्वच्छ होते. गरम पाण्याने आंघोळ केल्यास आपल्या त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते आणि ती स्वच्छ राहून उजळते.

हे देखिल वाचा-

३. हायपरटेंशनचा धोका कमी होतो-  गरम पाण्याने आंघोळ करणं हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचं असतं.  जनरल हार्टमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोध अभ्यासानुसार रोज गरम पाण्याने अंघोळ करणं कार्डियोवॅस्कुलर हेल्दसाठी चांगलं असतं.. तसचं गरम पाण्याने आंघोळ केल्याने उच्च रक्त दाबाची समस्या कमी होते. 

४. डोकेदुखी कमी होते- गरम पाण्याने आंघोळ केल्यास डोकेदुखी कमी होवू शकते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन (WHO) च्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार गरम पाण्याने आंघोळ केल्यास तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखी पासून आराम मिळू शकतो.

५. अंगदुखी कमी करण्यासाठी- गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदना आणि अंगदुखी कमी होण्यास मदत होते. दिवसभर जर तुम्ही शारीरीक कष्टाचं काम केलं असेल किंवा वर्कआऊटनंतर काही वेळाने तुम्ही गरम पाणी अंगावर घेतलं तर तुम्हाला आराम जाणवेल. तसचं पाय दुखत असल्यास तुम्ही गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास तुम्हाला आराम वाटेल. 

थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

१. केस चमकतात त्वचा सॉफ्ट होते- थंड पाण्यामुळे तुमच्या त्वचेवरील छिद्र घट्ट होतात. तसचं थंड पाण्याने केस धुतल्यास त्यातील नैसर्गिक तेल टिकून राहण्यास मदत होते आणि केस चमकदार दिसतात. तसचं थंड पाण्याने आंघोळ करणं त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करतं.

२. रक्त प्रवाह चांगला राहतो-  थंड पाण्याने आंघोळ केल्यास संपूर्ण शरीरातील रक्त प्रवाह वाढतो. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगल होण्यास मदत होते. 

३. डिटॉक्सिफिकेशन- थंड पाणी शरीराला डिटॉक्सिपाई करण्यास मदत करतं. सकाळी लवकर उठून थंड पाण्याने आंघोळ केल्यास तुमच्या शरीरातील घाण तसचं अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होईल.

४. तणाव कमी करणं-  थंड फवाऱ्यांमुळे कधीही आराम मिळतो आणि स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. तसचं थंड पाण्याचे फवारे तुमचा मूड चांगला करतात आणि नैराश्य कमी करण्यास मदत करता. यामुळे आळस आणि थकवा दूर होते. यामुळे थंड पाण्याच्या शॉवर खाली आंघोळ घेतल्याने तुमचा तणाव कमी होवू शकतो.

५. वजन कमी करणे-  थंड पाण्याने आंघोळ करण्याचा आश्चर्यकारक फायदा म्हणजे वजन कमी होणे. थंड पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या कॅलरीज जलद बर्न होण्यास मदत होईल. यामुळे तुमची उर्जेची पातळी वाढते ज्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: पाचोर्‍यातील कृष्णापुरीतील उपद्रवी माकडाला पकडण्यात यश

SCROLL FOR NEXT