white discharge esakal
आरोग्य

डॉक्टरी इलाज नाही तर या घरगुती उपायांनी आठवड्याभरात थांबेल white discharge

पांढरे पाणी म्हणजे ल्युकोरिया काय आहे, त्याची कारणे काय आहेत आणि ते टाळण्यासाठी घरगुती उपाय कोणते ते जाणून घेऊया.

साक्षी राऊत

white discharge : ल्यूकोरिया ज्याला आपण व्हाइट डिस्चार्ज असंही म्हणतो. अनेक महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. या समस्येत महिलांच्या योनीतून पांढऱ्या, पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा डिस्चार्ज होतो. डॉक्टर विनोद शर्मा यांच्या मते, व्हाइट डिस्चार्ज होणे हे सामान्यही असू शकते किंवा एखाद्या इन्फेक्शनचं लक्षणही असू शकतं.

असे मानले जाते की पांढरा स्त्राव योनी, अंडाशय, फॅलोपियन ट्यूब किंवा गर्भाशय सर्विक्समधून

येऊ शकतो. या लेखात, पांढरे पाणी म्हणजे ल्युकोरिया काय आहे, त्याची कारणे काय आहेत आणि ते टाळण्यासाठी घरगुती उपाय कोणते ते जाणून घेऊया.

व्हाइट डिस्चार्जची कारणं काय?

सेक्सुअल ट्रांसमिट डिजीज

प्रायव्हेट पार्टला साफ न ठेवणे

कॉपर टी चा वापर करणाऱ्या महिलांमध्ये व्हाइट डिस्चार्जची समस्या जास्त

रक्ताची कमतरता किंवा अॅनिमियाचा त्रास असल्यास

जास्त तळलेलं, स्पायसी खाल्ल्याने

डायबिटीज असल्यास

इम्युन सिस्टिम कमकुवत असल्यास

स्ट्रेसमुळे

वेळेत जेवण न करणे यामुळे

व्हाइट डिस्चार्जची लक्षणं

कंबर आणि हातापायांत दुखणं

पोटात जडजड वाटणे

प्रायव्हेट पार्टमध्ये खाज सुटणे

सतत बाथरूमला जाणे

अशक्तपणा आणि चक्कर येणे

भूख कमी होणे

जीव घाबरणे आणि डोळ्यासमोर अंधारी येणे

मुत्रपिंडात वेदना होणे

पिकलेली केळी हे ल्युकोरियाने पीडित महिलांसाठी सर्वोत्तम घरगुती उपचारांपैकी एक आहे. तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी याप्रमाणे खाऊ शकता. याशिवाय पिकलेली केळी साखरेसोबत खाल्ल्यानेही लवकर आराम मिळतो. एक ग्लास दुधात अर्धा चमचा तूप आणि केळी मिसळून प्या. एक केळ मधोमध कापून त्यात एक ग्रॅम तुरटी शिंपडून खावी. हे किमान आठवडाभर करा.

आवळा

एक ते दोन चमचे आवळ्याची पेस्ट बनवून त्यात मध मिसळून चाटावे. एक चमचा आवळा पावडर एक कप पाण्यात मिसळा आणि उकळवा आणि ते अर्धे कमी करा. ते थंड झाल्यावर त्यात मध मिसळून प्या.

अंजीर

अंजीर हे ल्युकोरियासाठी आणखी एक स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. चार अंजीर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. हे सकाळी रिकाम्या पोटी खा. महिनाभर असे केल्याने पांढऱ्या पाण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. (Women Health)

मेथीचे दाणे

मेथी दाणे ल्युकोरियासाठी उत्कृष्ट उपाय आहेत. एक लिटर पाण्यात तीन चमचे मेथीचे दाणे उकळवून ते थंड झाल्यावर प्या. असे केल्याने तुम्हाला फायदा होईल.

धनिया

दोन चमचे अख्खी कोथिंबीर घेऊन ते एका ग्लास पाण्यात टाकून चांगले उकळा. पाणी अर्धे राहिल्यावर सकाळ संध्याकाळ प्यायला सुरुवात करा. आठवडाभर असे केल्याने रोग बरा होतो. (Health)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT