children  sakal
आरोग्य

Health Tips: बदलत्या हवामानात मुले पडू शकतात या 3 आजारांना बळी

हवामानातील बदलामुळे काही मुले लवकर आजारी पडतात.

Aishwarya Musale

हवामानातील बदलामुळे काही मुले लवकर आजारी पडतात. हा काळ पालकांसाठी खूप आव्हानात्मक आहे. काही वेळा खूप काळजी घेऊनही मुले आजारी पडतात. त्यामुळे पालकांना याची फार चिंता आहे. पण असं का होतं याचा कधी विचार केला आहे का? प्रत्येक वेळी हवामान बदलते तेव्हा काही मुले संसर्ग किंवा सर्दी आणि ताप यासारख्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना का बळी पडतात?

प्रत्येक वेळी हवामान बदलल्यावर काही मुले आजारी का पडतात हे आपण आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. अशा परिस्थितीत पालकांनी काय लक्षात ठेवावे?

डॉ.अरुण शहा (ज्येष्ठ बालरोगतज्ञ) यांनी ऋतू बदलामुळे मुले आजारी पडण्याची अनेक कारणे सांगितली आहेत. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याची अनेक कारणे आहेत. डॉक्टरांनी सांगितले की काही मुलांना पूर्णपणे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत राहते आणि ते वारंवार आजारी पडतात.

दुसरीकडे, जर काही मुलांना आधीच धोकादायक आजार आहेत, तर ते हवामानातील बदलामुळे लवकर आजारी पडतात. याशिवाय शेवटची पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुलांची जीवनशैली. जंक फूड, शिळे अन्न, शारीरिक हालचालींचा अभाव किंवा स्वच्छतेची काळजी न घेतल्याने काही मुले लवकर आजारी पडतात.

अशी काळजी घ्या

पालकांनी हे लक्षात ठेवावे की जर लसीकरण चुकले असेल तर त्यांनी ते करून घेतलेच पाहिजे. बालकांच्या चांगल्या आरोग्यासाठी संपूर्ण लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे डोस दिले जाऊ शकतात. व्हिटॅमिन ए सप्लिमेंट्स, न्यूमोकोकल कंजुगेट लस, निष्क्रिय पोलिओ लस, रोटाव्हायरस लस, हिपॅटायटीस बी लस आणि न्यूमोकोकल लस या काही लसी आहेत ज्या तुम्ही मुलांना देऊ शकता.

यासोबतच हेल्दी लाइफस्टाइल खूप महत्त्वाची आहे. मुलांना हात धुण्याची सवय लावावी. बाहेरून जंक फूड खाण्याऐवजी घरचे पौष्टिक अन्न खा. मुलांना अशा क्रियाकलापांमध्ये सामील करा ज्यामध्ये ते शारीरिकरित्या सक्रिय राहतात. या टिप्स वापरूनही, तुम्ही मुलांना आजारांपासून बऱ्यापैकी वाचवू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT