Kids' Oral Unhygiene Causes sakal
आरोग्य

Kids Dental Hygiene: दररोज दात घासूनही मुलांचे दात का किडतात? ही असू शकतात कारणं

Common Dental Mistakes That Lead to Tooth Decay in Kids: दररोज दात घासूनही मुलांचे दात किडण्यामागची कारणं आणि त्यावर उपयुक्त उपाय जाणून घ्या.

सकाळ वृत्तसेवा

Hidden Causes of Tooth Decay in Children: माझा मुलगा दररोज दात घासतो, तरीही त्याचे दात किडले आहेत ! अशी अनेक पालकांची तक्रार असते. परंतु दात किडण्याची अनेक कारणे असतात. दोन वेळा दात घासण्याची सवय कधीपासून आहे, योग्य पद्धतीने दात घासतो का? रात्री झोपण्यापूर्वी दात घासतो का? दिवसभरात काही खाल्ल्यानंतर चूळ भरतो का ? दात किडण्याची बरीचशी कारणे या प्रश्‍नांशी निगडित आहेत.

लहान मुलांमध्ये दाताचे महत्त्व

लहान मुलांच्या शरीराची वाढ सातत्याने होत असते. त्यासाठी दररोज संतुलित व पौष्टीक आहाराची गरज असते. तो न मिळाल्यास मुलांच्या बुद्धीमत्तेवर, व्यक्‍तिमत्त्वावर, शारीरिक क्षमतेवर परिणाम होतो. अन्न चांगले चावून खाण्यासाठी दातांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे.

दात किडून दुखत असल्यास खाण्याचा मुले कंटाळा करतात. त्यामुळे चावण्यास कठीण असलेले पदार्थ, जंक फुड यांचे सेवन अधिक प्रमाणात होते. परिणामत: शरीराचे पोषण होत नाही.

वयाच्या सहाव्या वर्षी मुलांना कायम स्वरूपाच्या दाढा येतात. या दाढांना खाचखळगे असतात. त्यात अन्नकण अडकून दाढा किडू लागतात. अशा परिस्थितीत दुर्लक्ष केल्यास ही कीड पसरते. व दात दुखू लागतात त्यातून अनेक पालकांची गैरसमजूत असते, की दाढा दुधाच्या आहेत व त्या पडणारच आहेत. त्यावर योग्य उपचार केले जात नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT