litchi
litchi  sakal
आरोग्य

Fruit In Summer: उन्हाळ्यात 'लिची' खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

Aishwarya Musale

लिची हे अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट फळ आहे. लिची उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवते. लिचीचा वापर करून पेय, आईस्क्रीम आणि इतर अनेक गोष्टी बनवल्या जातात. त्याची चव गोड असते. लिची आरोग्यासाठीही चांगली आहे. लिचीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यात भरपूर खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. लिचीमध्ये व्हिटॅमिन सी देखील असते.

हे पोषक घटक आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. हे खाल्ल्याने तुम्ही स्वतःला अनेक आजारांपासून वाचवू शकता. लिचीचे आरोग्यदायी फायदे काय आहेत, त्याबद्दल सर्व काही आम्ही तुम्हला सांगतो.

अँटिऑक्सिडेंट गुणधर्म

लिचीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते शरीराचे फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून रक्षण करतात. लिची खाल्ल्याने निरोगी राहण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म हृदयाला निरोगी ठेवतात. जर तुम्हाला हंगामी आजारांपासून वाचायचे असेल तर तुम्ही लिची खाऊ शकता.

पचनसंस्था निरोगी राहते

लिचीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. लिचीमुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. त्यात भरपूर फायबर असते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यामुळे अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो.

रोग प्रतिकारशक्ती साठी

लिचीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते, तेव्हा तुम्ही स्वतःला हंगामी संसर्गापासून वाचवू शकता.

निरोगी त्वचा आणि केस

लिची खाल्ल्याने तुमचे केस आणि त्वचा देखील निरोगी राहते. त्यात व्हिटॅमिन ई असते. याच्या मदतीने तुम्ही त्वचेला सनबर्न आणि जळजळ होण्यापासून वाचवू शकता. लिचीमध्ये कॉपर देखील असते. त्यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते. म्हणूनच निरोगी त्वचा आणि केसांसाठी तुम्ही दररोज लिची देखील खाऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT