Sweet Corn  Sakal
आरोग्य

Sweet Corn: पावसाळ्यात मक्याचे कणीस खाल्ल्यावर पाणी का पिऊ नये? वाचा तज्ञ काय सांगतात

Avoid Drink Water after Eating Sweet Corn: अनेक लोकांना पावसाळ्यात गरम मक्याचे कणीस कायला आवडते. पण ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. कारण त्यामुले पोटासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

पुजा बोनकिले

Health care Tips: मान्सूनचे आगमन सुरू होताच अनेक ठिकाणी भाजलेले मक्याचे कणीसांची विक्री सुरू होते. त्यावर मीठ आणि लिंबू पिळण्याचा स्वाद द्विगुणित होतो. तसेच जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा भाजलेले मक्याचे कणीस खाण्याची मज्जा अधिक वाढते कणीसमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी12, कॅल्शियम, फायबर असे अनेक पोषक घटक असतात. पण मक्याचे कणीस खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळावे. अन्यथा पोटासंबंधित समस्या निर्माण होतात. तसेच भाजलेले मक्याचे कणीस खाताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

भाजलेले मक्याचे कणीस खाल्ल्यावर पाणी पिणे टाळावे?

तज्ज्ञांच्या मते भाजलेले मक्याचे कणीस खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. कारण असे केल्यास पोटासंबंधित आजार उद्भऊ शकतात. तसेच पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते. असे घडते कारण मक्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि स्टार्च असते, म्हणून ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटदुखी, पोटात गॅस तयार होणे, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. ही एक अस्वस्थ परिस्थिती असू शकते. हे टाळण्यासाठी मका खाणे आणि पाणी पिणे यात काही वेळ अंतर ठेवण्याचा सल्ला तज्ञ देतात. तुम्ही ४५ मिनिटानंतर पाणी पिऊ शकता.

भाजलेले मक्याचे कणीस काताना कोणती काळजी घ्यावी?

भाजलेले मक्याचे कणीस खाताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जसे की पावसाळ्यात अनेक ठिकाणी भाजलेले कणीस मिळतात. मक्याचे कणीस नेहमी ताजे आणि गरमच खावे. जास्त वेळ साठवून ठेवलेले कणीस खाणे टाळावे. कारण त्या बॅक्टेरिया वाढू शकतात. तसेच पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत होते. यामुळे पोटासंबंधित आजार निर्माण होऊ शकतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT